Big Breaking – अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला!

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला आहे. सध्या त्याला उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री ३ च्या सुमारास ही घटना घडली. वांद्रे येथील राहत्या घरात सैफ आली खानवर चोराने चाकू हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याती प्रक्रिया सुरू असून आरोपीच्या शोधासाठी, अटकेसाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आहे.   या सैफ अली खान याची पत्नी , अभिनेत्री करीना कपूर खान तसेच त्यांची मुलं सुरक्षित आहे. हल्ल्याच्या या घटनेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलेले नाही. प्राथमिक तपासानंतर पोलीस लवकरच या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊ शकतात. घराभोवती लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles