सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर झाले असून त्याचे वितरण उद्या शुक्रवार, दिनांक. 17 जानेवारीला दुपारी तीन वाजता महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत होणार असून कार्यक्रमाला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. हा कार्यक्रम सावंतवाडीतील काझी शहाबुददीन हाॅलमध्ये होणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत जाधव सचिव राकेश परब यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून दिली आहे.”
‘हे’ आहेत पुरस्कारांचे मानकरी –
सिंधुदुर्ग प्रेस क्लबचे पुरस्कार सावंतवाडीतील पत्रकार रूपेश हिराप यांना तर प्रेस क्लबचा डिजिटल मिडिया पुरस्कार आनंद धोंड, प्रेस क्लब युवा पत्रकार पुरस्कार दोडामार्ग येथील प्रतिक राणे तर प्रेस क्लब कर्मचारी संघटना पुरस्कार गुरूनाथ कदम यांना जाहीर करण्यात आले आहेत.

या पुरस्कारांचे वितरण राज्याचे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाला माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी तसेच प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी सावंतवाडीतील पत्रकार उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रेस क्लबच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा विशेष सन्मान देखील करण्यात येणार आहे.
ADVT –



