Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

मळगाव येथे ‘FOSTAC’ प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न!

सावंतवाडी : बाल रक्षा भारत संस्था संचलित ‘Eat Right School’ प्रकल्प सिंधुदुर्ग आयोजित “पोषण आहार बनविणाऱ्या महिलांकरिता एकदिवसीय प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम संपन्न झाला. केंद्र शासनाच्या भारतीय अन्नसुरक्षा मानके प्राधिकरण (Food Safety and Standard Authority of India) सुरक्षित अन्न व निरोगी आहाराची उपलब्धता आणि वापर सुनिश्चित करून अन्नसुरक्षा व पोषण बदलासाठी अनेक उपक्रमांपैकी एक जागतिक स्तरावरील मोंडेलिझ या कंपनीच्या अर्थसहाय्याने मुंबई शहर व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘ईट राईट स्कूल’ उपक्रम सावंतवाडी तालुक्यातील एकूण 65 शाळांमध्ये सदर प्रकल्पाचे काम सुरू आहे.
सदर प्रशिक्षण मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. व्यासपीठावर बाळ रक्षा भारत संस्थेचे प्रकल्प समन्वयक किरण थोरात, शशिकांत सातार्डेकर, विद्या विकास हायस्कूल आरोसचे मुख्याध्यापक शिरीष नाईक, सौ. गोसावी मॅडम, सौ. परुळेकर मॅडम, दिल्लीच्या (FSSAI) प्रशिक्षण म्हणून लाभलेल्या श्रीमती अपर्णा गुप्ता, आकाश मणचेकर, मनीषा खणगावकर, विकी केरकर, रोहन शारबिद्रे, फ्रेन्सिना लूद्रिक आदी उपस्थित होते.


प्रास्ताविक करते समय सदर प्रशिक्षण वर्गात पुढील विषयांवर सविस्तररित्या प्रशिक्षण देण्यात आले, विषय पुढीलप्रमाणे १) अन्नसुरक्षा आणि स्वच्छता २) परिसर स्वच्छता कचऱ्याची विल्हेवाट आणि व्यवस्थापन ३) कृषिधन आणि पाण्यातून होणाऱ्या विषबाधेपासून प्रतिबंध कसा करावा ४) अन्न आणि पाणी सुरक्षित संदेश ५) वैयक्तिक स्वच्छता.
उपस्थित महिला एकूण 46 होत्या. यांना मार्गदर्शन करतेवेळी, “आपण सेवाभावी वृत्तीने हे पवित्र कार्य करीत आहात, असेच कार्य सदैव चालू ठेवावे.” असे प्रतिपादन श्री. फाले सर यांनी केले.
प्रशालेचे कर्मचारी श्री रितेश राऊळ आणि श्री दाजी राऊळ यांचे त्यांनी कार्यक्रमासाठी दिलेल्या योगदानासाठी गुलाब पुष्प देऊन विशेष कौतुक करण्यात आले.
या या प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शशिकांत सातारकर यांनी तर आभार श्रीमती फ्रेन्सिना लुद्रिक यांनी मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles