Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

भोसले इन्स्टिटयूट आणि एमसीईडी यांच्यात सामंजस्य करार.! ; उद्योजकता वाढीसाठी केले जाणार एकत्रित प्रयत्न.

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र या दोन संस्थांमध्ये उद्योजकता वाढीसाठी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये उद्यमी वृत्ती वाढवणे व स्वयंरोजगाराला चालना देणे हे या कराराचे मुख्य उद्दिष्ट आहे. याकरिता दोन्ही संस्था एकत्रितपणे उपक्रम राबवतील. यामध्ये उद्योजकता विकास कार्यशाळा, व्याख्यानमाला, स्टार्टअप इन्क्यूबेशन सेंटर इत्यादीचा समावेश असेल.

यावेळी एमसीईडी, सिंधुदुर्गचे प्रकल्प अधिकारी राजेश कांदळगावकर म्हणाले की, विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत आमच्या विभागातर्फे केली जाईल. यामध्ये मार्गदर्शन, वित्तपुरवठा आणि नेटवर्किंगच्या संधींचा समावेश असेल. यातून विद्यार्थ्यांना उद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळेल, रोजगार निर्मिती वाढेल आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालनाही मिळेल.

याप्रसंगी कॉलेजचे उपप्राचार्य गजानन भोसले, एमसीईडी समन्वयक सुषमा साखरे, कॉलेजचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी मिलिंद देसाई, मेकॅनिकल विभागप्रमुख अभिषेक राणे, टीपीओ कोऑर्डीनेटर एम.टी.पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles