सावंतवाडी : ‘लावा झाड एक तरी!’ असा संदेश देत सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील अंगणवाडी क्रमांक 15 च्या वतीने तुलसी रोपे हळदी कुंकवाचे वाण म्हणून देत आगळावेगळा पर्यावरण पूरक हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाचे आयोजन माठेवाडा येथील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील अंगणवाडी क्रमांक 15 च्या वतीने करण्यात आले होते सुरुवातीला दीप प्रज्वलन सौ. श्रेया सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी हळद-कुंकू लावून तुळशीचे रोप सर्व महिलांना अंगणवाडी सेविका अनुराधा पवार यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी अंगणवाडी मदतनीस अमिषा सासोलकर प्रशालेच्या मुख्याध्यापिका भक्ति फाले , शिक्षिका प्राची ढवळ, पूजा ठाकूर ,भावना गावडे हेमांगी जाधव तसेच पालक महिला सपना विरनोडकर, स्वानंदी नेवगी, राधिका मुंज, भावना किटलेकर,, पूजा साटेलकर नेहा काष्टे आर्या मुंज, तेजस्विनी चव्हाण, संगीता पेडणेकर, पूजा मुंज पूजा गावडे, प्रांजल मेस्त्री, धनश्री पाटील आदी उपस्थित होत्या.

यावेळी तुळशीचे महत्त्व महिलांसाठी आणि घर कुटुंबासाठी किती महत्त्वाचे आहे याची माहिती अंगणवाडी सेविका अनुराधा पवार यांनी दिली त्या म्हणाल्या अंगणात तुळशी वृंदावनात दररोज तुळशीची पूजा करून पाणी घालण्याची आपली संस्कृती आहे तुळशी रोपाचे महत्त्व प्राचीन काळापासून आहे दारात तुळशी असाव्यात तुळशी मधून दिवस-रात्र प्राणवायू मिळतो तुळस ही महिलेची सखी आहे त्यामुळे तुळशीशी महिलांचे मोठे ऋणानुबंध आहेत त्यामुळे हळदी कुंकवाच्या यानिमित्ताने तुळशी रोप वाण म्हणून देत असताना “एक तरी झाड लावा” असा संदेश या निमित्ताने देण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही अशाच पद्धतीने आगळावेगळा पर्यावरण पूरक हळदीकुंकू समारंभ अंगणवाडी च्या वतीने साजरा करण्यात आला.

{फोटो- सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथे सौ. श्रेया सुधीर आडिवरेकर यांना हळदी कुंकवाचे वाण म्हणून तुळशी रोप देताना अंगणवाडी सेविका अनुराधा पवार सोबत अमिषा सासोलकर, भक्ति फाले, प्राची ढवळ, पूजा ठाकूर, भावना गावडे, हेमांगी जाधव, सपना विरनोडकर, स्वानंदी नेवगी, राधिका मुंज, भावना किटलेकर,, पूजा साटेलकर, नेहा काष्टे, आर्या मुंज, तेजस्विनी चव्हाण, संगीता पेडणेकर आदी.}


