सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या गावांचा अभ्यास करा. गाळ काढायच्या नद्या व ठिकाणे प्रथम निश्चित करा. प्रथम प्राधान्यक्रम असलेली पाहिली पाच ठिकाणे ठरवा. त्या ठिकाणच्या नद्यांमधील गाळ काढण्याचे काम तातडीने सुरू करा. कोणाच्या खिशात पैसा टाकण्यासाठी ही कामे करू नका तर यापुढे जनतेसाठी काम करा असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले.

या जिल्ह्यात अनेक गावे पूर परिस्थितीमुळे बाधित झाली आहेत. पुरामध्ये काय गावातील जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले होते. ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी नद्यांमधील गाळ काढणे आवश्यक आहे. जो उपलब्ध निधी आहे त्यातून प्रथम प्राधान्यक्रमाची ठिकाणी ठरवा. व त्या ठिकाणच्या गाळ मोकळा करा. अशा ठिकाणांची यादी आजच निश्चित करा व 24 जानेवारी रोजी आपल्या समोरील बैठकीत सादर करा. आपण त्याला मंजुरी देऊ. व आणखीही निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी या बैठकीत दिली. जिल्ह्यात अनेक विकास कामे सुरू आहेत, अनेक रस्त्यांची कामे ही सुरू आहेत. जर या कामाला नद्यांमधील गाळ आवश्यक असेल तर त्याबाबतची ही योजना तयार करा. असे निर्देश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना या बैठकीत दिले.
नद्यांमधील उपसण्यासाठी किंवा एखाद्या ठेकेदाराला काम देण्यासाठी ही कामे नकोत, तर तो गाळ काढल्यानंतर पुराचे पाणी त्या गावात घुसू नये व केलेल्या कामाचा जनतेसाठी उपयोग व्हावा याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे. जबाबदाऱ्याने हे काम करावे अन्यथा आपल्याला दखल घ्यावी लागेल असेही नितेश राणे यांनी या बैठकीत स्पष्ट केले.


