कणकवली : विद्यामंदीर प्रशालेचा स्काउट गाईड या कब बुलबुल कॅम्प तळरे येथे यशस्वीपणे पार पडला प्रशालेतील पन्नास विद्यार्थी / विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदविला. स्वावलंबन आणि शिस्त, स्वकष्टाची जाणीव तसेच राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम यांचे शिक्षण देणारी महत्वाची प्रेरणा स्काउट गाईडना दिली जाते. तसेच माणूस म्हणून जगण्याची उर्मी गाईडना प्रशिक्षण दरम्यान दिली जाते या कॅम्पला समूह भावना आणि एकात्मता यांचीही शिकवण दिली जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभाग आणि पालकमंत्री नितेश राणे यांनीही या प्रशिक्षणास भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच कॅम्प यशस्वीरित्या करून परत प्रशालेत आल्यानंतर सर्व स्काउट गाईडचे विद्यार्थी व स्काउट मास्टर श्री. शेळके जे जे सर सौ. विद्या शिरसाट आणि प्रशालेतील सर्व शिक्षक पर्यवेक्षक सौ. वृषाली जाधव, श्री. वणवे सर प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री. राऊत आदी यावेळी उपस्थित होते.


