वेंगुर्ला : जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाप्रीत्यर्थ साहित्य प्रेरणा कट्टा, आजगाव आणि रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालय, शिरोडा आयोजित साप्ताहिक खुल्या चर्चेच्या पंधराव्या पुष्पांतर्गत जयवंत दळवी यांच्या ‘निराळा ’या कथासंग्रहावर चर्चा करण्यात आली.
या कथासंग्रहावर सौ.वैभवी राय शिरोडकर व श्री.विनय सौदागर यांनी भाग घेतला.
सौ.वैभवी राय शिरोडकर यानी या कथासंग्रहातील ‘…आणि ती पुन्हा येते! या कथेचे वाचन केले व या कथासंग्रहावरील मुखपृष्ठाबद्दल सुरेख विवेचन केले.
श्री.विनय सौदागर यानी या संग्रहातील ‘निराळा’ या कथेविषयी विवेचन करून कथेतील काही भागाचे वाचन केले.
चर्चेच्या शेवटी खटखटे ग्रंथालयाच्या ग्रंथपाल श्रीमती अर्चना लोखंडे यानी आभार मानले.
या साहित्य चर्चेत सर्वश्री सचिन दळवी,सोमा गावडे,गजानन मांद्रेकर,प्रकाश मिशाळ,प्राची पालयेकर,अनिश्का रगजी,अँथोनी आल्मेडा व शेखर पणशीकर यानी भाग घेतला.