Wednesday, July 9, 2025

Buy now

spot_img

वैभववाडी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी!

वैभववाडी : येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे महान नायक सुभाषचंद्र बोस यांची १२८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेताजींच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य, डॉ. एन. व्ही. गवळी, लेफ्टनंट आर.पी. काशेट्टी, एनसीसी अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून 58 महाराष्ट्र बटालियनचे ट्रेनिंग जेसीओ सुभेदार जसबीरसिंग नेगी व हवालदार संतोष भाटकर उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी नेताजींच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि त्यांचे धाडसी नेतृत्व यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी नेताजींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशसेवा करण्याचे आवाहन केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची विचारसरणी व धैर्य आजच्या पिढीच्या एनसीसी कॅडेट्ससाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या आदर्शांनी युवकांना देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली आहे. एनसीसी ही नेताजींच्या विचारांची आधुनिक रूपरेषा आहे, जी देशभक्ती, नेतृत्व, आणि अनुशासनाच्या माध्यमातून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवकांना तयार करत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी “जय हिंद” चा जयघोष करून नेताजींना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.निलेश कारेकर व आभार कॅडेट श्रुती जाधव हिने मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles