वैभववाडी : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचा ध्वजवंदन कार्यक्रम स्थानिक समिती अध्यक्ष सज्जनकाका रावराणे यांच्या शुभहस्ते व अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या निमित्ताने स्पंदन विभागाच्या वतीने राष्ट्रभक्तीपर
भित्तीपत्रकाचे प्रदर्शन करण्यात आले होते.यावेळी स्थानिक समिती सचिव प्रमोद रावराणे, विश्वस्त शरदचंद्र रावराणे, निलेश रावराणे, प्र.प्राचार्य डॉ.एन.व्ही.गवळी, लेफ्टनंट रमेश काशेट्टी, कार्यालयीन अधीक्षक संजय रावराणे, प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक व काही शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते.

महाविलयातील एनसीसी विभागाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात लष्करी प्रात्यक्षिके सादर करून एनसीसी कॅडेट्सनी देशभक्तीचे अनोखे दर्शन घडवले. ज्यामध्ये एनसीसी कॅडेट्सनी प्रभावी शिस्तबद्धता, विविध पथसंचलन, ड्रिल्स, आणि लष्करी प्रात्यक्षिके सादर केली. या प्रात्यक्षिकांमुळे तरुण पिढीला देशसेवेसाठी प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्र.प्राचार्य डॉ.गवळी यांनी देशभक्ती, शिस्त आणि जबाबदारीचे महत्त्व सांगत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन कॅडेट्सच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे कौतुक केले. संस्था पदाधिकारी यांनी कॅडेट्सच्या शिस्तबद्ध कामगिरीचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


