Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

पाव अन् भाजी खाऊन दिवस काढले, बॅंकेत नोकरी! ; ‘पद्मश्री’ अशोक सराफ यांची एकूण संपत्ती किती?

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ भारत सरकारकडून जाहीर होणारा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दलची घोषणा 2025 च्या प्राजसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली. तर मागील वर्षी महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला होता. ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्याबद्दल अशोक सराफ यांच्यावर सर्वच स्तरांमधून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं जात आहे.

‘पद्मश्री’ मिळाल्याबद्दल हरहुन्नरी कलाकाराचं सर्वच स्तरातून कौतुक –

मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये अभिनयाच्या जोरावर अशोक सराफ यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अशोक सराफ यांनी विनोदी भूमिकेसोबतच गंभीर भूमिकाही साकारल्या, अगदी खलनायकाचीही भूमिका अशोक सराफ यांनी साकारल्याचं पाहायला मिळालं आहे. या सर्व भूमिका त्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्या. सर्वच रसिकांच्या मानवरही अधिराज्य गाजवणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पण हा टप्पा गाठणं अशोक सराफ यांच्यासाठी फार सोपं नव्हतं. सुरुवातीचे त्यांचे दिवस हे अतिशय खडतर होते.

अशोक सराफ यांनी लहान असल्यापासूनच रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांची अनेक नाटके गाजली. पण नाटकातून पुरेसे पैसे मिळत नसल्याने घरखर्चाला हातभार लागावा म्हणून त्यांनी बॅंकेतील नोकरी स्विकारली.

नाटक, बॅंकेत नोकरी ते 235 रुपयांत चालवलेलं घर –

अशोक सराफ यांना त्यावेळी बँकेत 235 रुपये महिन्याला पगार मिळायचा. 235 रुपये पगारातून ते घर खर्चासाठी 200 रुपये द्यायचे. उरलेले 35 रुपये ते स्वतःसाठी ठेवायचे. या 35 रुपयांतून चित्रपट पाहण्याची आवड जोपासायचे.

राहिलेल्या पैशातूनच एक वेळचे जेवण असा महिन्याचा खर्च ते भागवायचे. बँकेच्या जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये त्यावेळी 10 पैशात पाव आणि 15 पैशात पातळ भाजी मिळायची. एवढ्या पैशातच ते आपलं दुपारचं जेवण करायचे.

पण याच परिस्थितीतून मार्ग काढत अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या आणि मेहनतीच्या जोरावर आज करोडोंची संपत्ती उभी केली आहे. तुम्हाला माहितीये का की अशोक सराफांची एकून संपत्ती किती आहे ते? चला जाणून घेऊयात.

अशोक सराफांची एकूण संपत्ती किती?

तर ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या अशोक सराफ यांची एकूण संपत्ती 37 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं म्हटलं जातं. अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाबरोबरच जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई केली आहे. अभिनेत्री आणि अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता जोशी- सराफ यांची एकूण संपत्ती जवळपास 10 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं म्हटलं जातं.

निवेदिता यांचा स्वतःचा साड्यांचा ब्रँड –

निवेदिता या उत्तम अभिनेत्री सोबतच यशस्वी उद्योजिकादेखील आहेत. निवेदिता या उत्तम अभिनेत्री तर आहेतच पण सोबतच त्या यशस्वी उद्योजिकादेखील आहेत. शिवाय त्यांचं स्वत:चं युट्युब चॅनेलही आहे. तसेच सोबतच त्या चित्रपट, मालिकाही करत असतात. शिवाय त्यांचा स्वतःचा साड्यांचा ब्रँड देखील आहे. ‘हंसगामिनी’ असं त्यांच्या साडीच्या ब्रँडचं नाव आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles