सावंतवाडी : श्री शिलकारी कला क्रीडा सेवा मंडळ निरवडे – भंडारवाडी येथे प्रजासत्ताक दिनी पार पडलेल्या खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत रेडी येथील समर्थ गवंडी याने प्रथम क्रमांक पटकावला.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनी श्री शिलकारी कला आणि सेवा मंडळ निरवडे – भंडारवाडी विविध कार्यक्रमांचे आयोजन करते, यावर्षीही खुल्या डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत रेडी येथील समर्थ गवंडी याने प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय नेहा जाधव (इन्सुली) , तृतीय नंदीनी बिले (सावंतवाडी) यांना मिळाले. विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षीस द्रिशम परब, श्रीधर पिंगुळकर यांना देण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालवणी निवेदक बादल चौधरी यांनी तर स्पर्धेचे परीक्षक भक्ती जामसंडेकर यांनी केले.
स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात शिलकारी कला आणि सेवा मंडळाच्या सदस्यांनी मेहनत घेतली यामध्ये समीर केरकर, महेश तुळसकर, बाबल मयेकर, शामसुंदर बर्डे, सुहास केरकर, शुभम नेमेळकर, प्रमोद बर्डे, रुपेश मयेकर यांची समावेश होता.
रेकॉर्ड डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी प्रथम.! ; श्री शिलकारी कला. क्रीडा सेवा मंडळ निरवडे – भंडारवाडीचे आयोजन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


