सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) च्या संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने दि.29 व 30 जानेवारी 2025 रोजी दोन दिवसीय टेकफेस्ट 2025 आयोजित करण्यात आली आहे . यामध्ये क्विज कॉम्पिटिशन, टोपोक्लॅप , वेब डेव्हलपमेंट, टेक्नोव्हेंचर क्वेस्ट, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट, हॅकिंग, बीजी एम आय ,सारख्या विविध स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्या आहेत.
संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. सौ.विभा गवंडे तसेच माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा.सौ.अक्षता गोडकर, प्रा.सौ.स्नेहल नाईक प्रा.प्रणाम कांबळी, आदित्य वर्धम, तन्वी शिंदे, निदा बेग यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे त्यातील विजेतांना रोख पारितोषिक व मेडल्स प्रदान करण्यात येणार आहेत तरी विद्यार्थ्यांनी जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले आहे.
एसपीके महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे उद्या ‘टेकफेस्ट’ -२०२५ चे आयोजन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


