नवी दिल्ली : पाकिस्तान हा आपल्या शेजारचा देश आहे. मात्र तो कायमच भारताला शत्रू मानत आला आहे. भारतासाठी डोकेदुखी ठरणाऱ्या दहशतवाद्यांना पोसायचं काम सुरुवातीपासूनच पाकिस्तान करत आला आहे. अनेकदा पाकिस्तानी सैनिक आणि भारताच्या सैनिकांमध्ये चकमकी झाल्या, मात्र प्रत्येक वेळी पळून जाण्याची नामुष्की पाकिस्तानवर ओढावली. पाकिस्तानकडून अनेकदा सीमावर्ती भागात हल्ला करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, मात्र त्यांना आपल्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
सैन्यदल असेल, आरोग्य व्यवस्था असेल, शिक्षण, आर्थिक क्षेत्र अशा सर्वच बाबतीमध्ये भारत पाकिस्तानच्या तुलनेत कितीतरी पटीनं पुढे निघून गेला आहे. मात्र पाकिस्तानची अवस्था सध्या खूप बिकट झाली आहे. पाकिस्तान कर्जबाजारी झाला असून, महागाईनं असमान गाठलं आहे. देशात सर्वत्र अशांतता असताना देखील पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पीओकेमध्ये भीषण आग लागली आहे, मात्र आता या आगीनं रौद्र रूप धारण केलं आहे. या आगीनं भारताच्या सीमावर्ती भागात असलेल्या जंगलाला देखील आपल्या कवेत घेतलं आहे.