Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

उद्धव ठाकरे यांचे पुन्हा भाजपाशी ‘मनोमिलन?’

मुंबई : राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आल्यानंतर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जातीने भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीकडे राजकीय निरीक्षकांनी पुढील राजकारणाचे संकेत मिळत असल्याचे म्हटले होते. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि भाजपाचे नेते एकाच मंचावर आले आहेत. त्याचे झाले काय भाजपाचे नेते पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त उद्धव ठाकरे वधूवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी पोहचले तेव्हा भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांची गुफ्तगू झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भेटींचा सिलसिला –

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पराग अळवणी यांच्या कन्येचा विवाह सोहळा होता. त्यानिमित्ताने शिवसेना नेते उद्धव ठाकरे वधू-वरांना शुभार्शीवाद देण्यासाठी पोहचले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर आणि विनायक राऊत हे देखील होते. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना देखील चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट देखील चर्चेत आली होती. भाजपाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची विधानभवनातील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. एकमेकांना कायम पाण्यात पाहाणारे दोन्ही नेते त्रयस्थ सोहळ्यात एकत्र येऊन एकमेकांशी गप्पा मारु लागल्याने राजकारणात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे पुन्हा भाजपाशी हस्तांदोलन करतात की काय ? याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

नेमके काय घडलं.?

या विवाह सोहळ्याला हजर राहून वधूवरांना आशीवार्द देऊन बाहेर पडत असताना उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील एकमेकांसमोर आले. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्या पुढे चालले होते.त्यामुळे सहाजिकच मिलिंद नार्वेकर यांची आधी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलणे झाले. यावेळी मिलिंद नार्वेकर यांनी मिश्किलपणे चंद्रकांत पाटील यांना विचारले, ‘काय युती कधी होतेय.?”

त्यावर दिलखुलास पणे चंद्रकांत पाटील यांनी देखील ”तो माझ्यासाठी सगळ्यात सुवर्ण क्षण असेल.!” असे म्हटले. त्यानंतर हशा उसळून दोघांनी एकमेकांना टाळी दिली.

पाठून उद्धव ठाकरे देखील आले आणि त्यांनी दोघांना (चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकर ) उद्देशून विचारले की, ”अरे काय कुजबुजताय?” त्यावर चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहात म्हणाले की, “मी हेच म्हणत होतो, युती होईल तो माझ्यासाठी सुवर्ण क्षण असेल !” पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये जोरदार खसखस पिकली…!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles