Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

इंग्रजी तत्वज्ञाचा देखील पराभव.! – ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. ह. ना. जगताप यांचे ‘चिंतन’.

चिंतन –

एका इंग्रजी तत्त्वज्ञाने राजकारणा संदर्भात एक महत्त्वाचे पुढील प्रमाणे उद्धरण दिले आहे. तो म्हणतो ‘Politics is the last resort of the Scoundrels’ मराठीमध्ये आपण याचे रूपांतर ‘ राजकारण हे बदमाश किंवा गुन्हेगारांचे शेवटचे आश्रयस्थान असते .’ असे करूया ! त्याचे हे वचन बहुतेक तिकडच्या परिस्थितीत सत्य ठरत असावे .
आपल्याकडील परिस्थिती मात्र ही वेगळी दिसते. आपल्याकडील राजकारणी मंडळींनी या इंग्रजी तत्त्वज्ञाचा पराभव केलेला दिसतो. गुन्हेगार गुन्हे करून राजकारणात येवून पवित्र होण्याचा प्रयत्न करतात असे हे वचन सांगते. परंतु आपला तसा अनुभव नाही कारण येथे तर राजकारणीच गुन्हेगारीकडे वळताना दिसतात.’ काही श्रीमंत लोक देवाची पूजा करण्यासाठी घरात देखील पुजारी नेमतात ‘ त्यामुळे या श्रीमंत मंडळींना पुण्य मिळते की नाही ते माहीत नाही . त्याचप्रमाणे ही राजकारणी मंडळी गुन्हे करणासाठी काही माणसांची नेमणूक करतात यामुळे राजकारणी लोकांना मात्र अपेक्षित प्राप्ती होते हे नक्की .आणि या दोन्ही प्रकारच्या व्यवस्था आपल्या समाज व्यवस्थेने मान्य केलेल्या आहेत असे दिसते .
महाराष्ट्रातील २८८ आमदारांपैकी ११३ आमदारांवर गंभीर स्वरूपाचे म्हणजे खून , खुनाचा प्रयत्न, बलात्कार, खंडणी उकळणे , असे गुन्हे आहेत . अशी आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे यावरून आपणा सर्वांनाच ही व्यवस्था मान्य आहे हे स्पष्ट होते. उमेदवार गुन्हेगार आहे हे माहीत असूनही तो आपले वैयक्तिक काम करतो म्हणून त्याला आपण निवडून देत आहोत.
एकूण काय तर राजकारण हे गुन्हेगारांना पवित्र करणारे किंवा प्रतिष्ठा मिळवून देणारे ठिकाण राहिलेले नसून ते आता गुन्हेगारीचे आश्रयस्थान झाल्याचे दिसते. एखाद्या गुन्हेगाराबाबत’माझा कार्यकर्ता ‘ एवढा शब्द प्रयोग एखाद्या लोकप्रतिनिधींनी पोलिस स्टेशनला कळविला की, पोलिसांना संबधितांकडून काही बिदागी मिळण्याची अपेक्षा करण्या पलिकडे काही कामच शिल्लक राहत नाही.

– डॉ. ह. ना. जगताप.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles