Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

सहशालेय स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मिळते चालना – संप्रवी कशाळीकर ; सावंतवाडीच्या ‘RPD’ त रंगली समूह देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा.

सावंतवाडी : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या समूह देशभक्तीगीत गायनसारख्या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असून अशा सहशालेय स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळते, असे राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य संग्राम, राष्ट्रप्रेम यांविषयी देशभक्तीपर गीतांचा जागर यांचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तर या देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेसाठी कला,वाणिज्य आणि विज्ञान या सर्व शाखांमधून वर्ग निहाय एकूण  वीस विद्यार्थी समूहाने भाग घेतला होता. सर्व विद्यार्थ्यांनी सप्तसुरांद्वारे अवघा सभागृह राष्ट्रप्रेमय युक्त वातावरणाने भारावून गेला.

अशा अतिशय उत्कृष्ट आणि सुरेल देशभक्तीपर गीत गाऊन प्रथम क्रमांक इयत्ता अकरावी विज्ञान ‘अ’, द्वितीय क्रमांक अकरावी वाणिज्य ‘ब’ तर तृतीय क्रमांक बारावी विज्ञान ‘अ’ या वर्गांनी पटकाविला. या गीतगायन स्पर्धेला परीक्षक म्हणून संगीत विशारद कुडतरकर सर, कळगुंटकर सर लाभले. कार्यक्रमाला सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा. विनिता घोरपडे, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा. रणजीत राऊळ , प्रा. दशरथ राजगोळकर, प्रा. सविता कांबळे. डॉ. संजना ओटवणेकर, प्रा. संतोष पाथरवट, प्रा. डॉ. अजेय कामत, प्रा. पवन वनवे, प्रा. दशरथ सांगळे, प्रा. वामन ठाकूर, प्रा. महाश्वेता कुबल,  प्रा. स्मिता खानोलकर, प्रा. माया नाईक, प्रा.जोसेफ डिसिल्वा, प्रा. राहुल कदम असे सर्व प्राध्यापक आणि सांस्कृतिक कमिटी सदस्य इत्यादी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार यांनी केले व आभार प्रा. माया नाईक यांनी मानले.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles