सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान’ विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून 16 ऑगस्ट 2024 पासून सावंतवाडी तालुक्यामध्ये कोलगाव जिल्हा परिषद गटापासून सुरुवात होत आहे. सकाळी कोलगाव येथे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर व जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. तरी सावंतवाडी तालुक्यातील मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका संघटक मायकेल डिसूजा यांनी केले आहे.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


