सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांची 97 वी जयंती ‘संस्थापक दिन ‘ म्हणून महाविद्यालयात साजरी केली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, सावंतवाडी राजघराण्याचे राजगुरू परमपूज्य राजेंद्र भारती महाराज, युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले’प्रमुख अतिथी वसंत तथा अण्णा केसरकर , संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहसंचालक अॅड. शामराव सावंत, कार्यकारी सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, लॉ कॉलेजच्या प्राचार्या डाॅ.अश्विनी लेले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, सावंतवाडी राजघराण्यावर प्रेम करणारे नागरिक यामध्ये नकुल पार्सेकर, प्रा. अन्वर खान, राजु बेग, सुरेश गवस, अॅड. सचिन गावडे ,यशवंत देसाई ,श्री नार्वेकर, प्रा. एम. पी. चौगुले, प्रा. जी. एम शिरोडकर, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाले. राजसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला.ए ग्रेड मिळवलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले स्वायत्त महाविद्यालय म्हणून अतिशय उत्तम रित्या प्रगती करत आहे, असे ते म्हणाले. राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांचा जीवन परिचय प्रा. माधव भिसे यांनी करून दिला. संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई
यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात कर्मवीर भावराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था सातारा, तर बापुजी साळुंखे यानी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर सांगली ,सातारा या परिसरामध्ये अनेक शाळा महाविद्यालय उभारून उच्च शिक्षण सुरु केले. कोकणामध्ये अशी कोणतीही व्यवस्था नव्हती, श्रीमंत राजेसाहेब यांनी 1961 मध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालय उभारून येथील गोरगरीब जनतेसाठी शिक्षणाची दारे खुली केली. यामुळेच येथील शेतकऱ्यांची ,गरिबांची मुले शिक्षण घेऊ शकली असे ते म्हणाले.
याप्रसंगी महसूल विभागाच्या दुय्यम निबंधक सौ स्नेहल तेरगावकर
यांनीं महसूल विभागामार्फत खरेदी विक्री, रजिस्टर लग्न, महारेरा ,अशा अनेक योजना त्यांनी सांगितल्या व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वसंत तथा अण्णा केसरकर यांनी श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांच्या अनेक आठवणी सांगितल्या.गोवा मुक्ती संग्रामामध्ये
राजेसाहेबांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली.त्यामुळे ते खरे स्वातंत्र्यसेनानी होते. भारतीय सेनेने लेफ्टनंट कर्नल हा किताब त्यांना दिलेला होता.सर्वसामान्य लोकांकडे जाऊन त्यांच्याप्रमाणे राहण्याची, त्यांची विचारपूस करण्याची हातोटी राजेसाहेबांकडे होती. राजेसाहेब हे येथील जनतेला आपले वाटायचे त्यामुळे येथील जनतेने त्यांना पंचवीस वर्षे आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवले.आणि राजे साहेबांनी विधानसभेमध्ये सुद्धा आपल्या कामाचा उत्तम ठसा उमटवला.असे ते म्हणाले,
कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज
लखमसावंत भोंसले यांनी नव्या पिढीला आवश्यक असलेले व भविष्यामध्ये उपयोगी पडतील व करिअर करता येतील असे कोर्सेस महाविद्यालयामध्ये सुरू केले जातील असे आश्वासित केले त्यानुसार त्यांनी आर्टिफिशुयल इंटेलिजन्स व डेटा सायन्स या विषयाला अनुसरून सर्टिफिकेट कोर्सेस महाविद्यालयामध्ये लवकर सुरू केले जातील असे सांगितले. उत्तम दर्जेदार कोर्सेस सुरु करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूणम सावंत यांनी केले तर आभार प्रा. डॉ. एस. एम. बुवा यांनी मानले.