कणकवली : महाराष्ट्र राज्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा शालेय शिक्षण व्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. राज्याच्या शैक्षणिक धोरणात सक्तीचे कलाशिक्षण आणि प्रशिक्षित कलाशिक्षकांचा अंतर्भाव करण्यात आला होता. मात्र, २०१२ पासून कलाशिक्षक भरती बंद झाली आणि २०१७ पासून कलाशिक्षकांची पदे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार, ५०० विद्यार्थ्यांच्या संख्येच्या शाळांमध्ये कलाशिक्षक पद भरतीचे आश्वासन देण्यात आले होते. तथापि, २० जानेवारी २०२५ च्या सुधारीत पोर्टल भरती पत्रात त्याचा कोणताही उल्लेख नाही. नवीन शैक्षणिक धोरणानुसार कला व कार्यानुभव विषयांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे, परंतु प्रशिक्षित कलाशिक्षक भरतीसंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाने या संदर्भात वेळोवेळी निवेदने देऊन “शाळा तेथे कलाशिक्षक” हे धोरण अवलंबण्याची मागणी केली आहे, कारण कलाशिक्षक हा शिक्षणाचा आत्मा आहे. राज्यातील सुमारे ७००० कलाशिक्षक आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढत आहेत. शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता ही मागणी पूर्ण केली जाऊ शकते.
या संदर्भात बी. जी. सामंत (राज्य उपाध्यक्ष, कलाध्यापक संघ) यांनी पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्यासमोर सविस्तर मुद्दे मांडले. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादानुसार, मंत्री नितेश राणे यांनी लवकरच मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्यासमवेत तातडीची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन कला शिक्षक संघटना सिंधुदुर्ग यांना दिले.
ही बैठक आयोजित करण्यासाठी व पालकमंत्री श्री नितेशजी राणे साहेबांची वेळ मिळवून देण्यासाठी श्री. समीर नलावडे (नगराध्यक्ष, कणकवली) यांनी विशेष सहकार्य केले. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. श्री. समीर नलावडे साहेब नगराध्यक्ष कणकवली यांच्या अथक परिश्रमांमुळेच या चर्चेची व महत्त्वपूर्ण बैठकांची आखणी शक्य झाली. त्यांच्या नेतृत्त्वात कलाशिक्षकांची मागणी जास्त प्रभावीपणे मांडली गेली.
त्यावेळी श्री. बी. जी. सामंत, श्री. रुपेश नेवगी सर, श्री. संभाजी कोरे सर, श्री. प्रसाद राणे सर, श्री. समीर चांदरकर सर, श्री. प्रकाश महाभोज सर, श्री. तुळशीदास कुबल सर, सौ. राखी अरदकर मॅडम, सौ. गौरी तवटे मॅडम, सौ. रश्मी बोराळकर मॅडम हे सर्व कला शिक्षक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाच्या मागण्यांसंदर्भात मंत्री नितेश राणे यांची सकारात्मक भूमिका!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


