Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय.! ; अभिषेक नाही, तर ‘हा’ खेळाडू ठरला ‘हिरो’!

मुंबई : कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या घरच्या मैदानात झालेल्या पाचव्या आणि अंतिम टी – 20 सामन्यात अभिषेक शर्मा याने धमाका केला. अभिषेक शर्मा याने 13 सिक्स आणि 7 फोरसह 135 धावांची वादळी खेळी केली. टीम इंडियाने अभिषेकच्या या खेळीच्या जोरावर वानखेडे स्टेडियमध्ये 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 247 धावा केल्या. टीम इंडियाच्या फंलदाजांनंतर गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. इंग्लंडचा 97 धावांवर खुर्दा उडवत टीम इंडियाने 150 धावांच्या फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. अभिषेक शर्मा याने बॅटिंगनंतर बॉलिंगनेही योगदान दिलं. अभिषेकने 2 विकेट्स घेतल्या. अभिषेकला या ऑलराउंडर कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.

Image

 

Image
अभिषेक हा टीम इंडियाच्या या विजयाचा हिरो ठरला. मात्र टीम इंडियाच्या या मालिका विजयाचा हिरो ठरला. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती हा टीम इंडियाच्या मालिका विजयाचा हिरो ठरला. वरुणने या मालिकेतील 5 सामन्यांत एकूण 14 विकेट्स घेतल्या. वरुणने या दरम्यान एका सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. वरुणने घेतलेल्या 14 विकेट्ससाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
वरुणची सामेननिहाय कामगिरी –

वरुण चक्रवर्ती याने मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. राजकोटमध्ये झालेल्या तिसर्‍या सामन्यात 5 विकेट्स मिळवल्या. चेन्नईत 2 तर कोलकातामध्ये 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles