Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आयुष पाटणकरला ‘गुणवंत खेळाडू’ पुरस्कार जाहीर प्रदान.

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग द्वारा सन २०२३-२४ चा सिंधुदुर्ग जिल्हा पुरुष गुणवंत खेळाडू पुरस्कार सावंतवाडी येथील आयुष दत्तप्रसाद पाटणकरला आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये दहा हजार, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी आयुषचे वडील दत्तप्रसाद पाटणकर व आयुष यांनी सदर पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कार प्रदान सोहळ्याला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांसह जिल्हा मुख्यालय कार्यालयातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. जाहीर झाला आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते सिंधुदुर्गनगरी येथे आयुष याला हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.

राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्देत आयुष याने प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदक मिळवून भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व केले होते. राज्यस्तरीय स्पर्धेत आयुषयाला ४०० पैकी ३७८ गुण मिळाले होते. यापूर्वी दिल्ली आणि भोपाळ येथे झालेल्या शूटींग असोसिएशनच्या स्पर्धेत आयुष हा राष्ट्रीय खेळाडू म्हणून घोषित झाला आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनसह महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक खेळ आयोजित करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि व्यासपीठ निर्माण होईल. घेण्यात येणाऱ्या विविध खेळांमध्ये नेमबाजी या खेळाचाही समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेतआंतरराष्ट्रीय खेळाडू अंजली भागवत, तेजस्विनी सावंत या सहभागी झाल्या होत्या. यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कु. आयुष दत्तप्रसाद पाटणकर याची याची 10 मीटर एअर पिस्तूल या क्रीडा प्रकारासाठी ऑलिम्पिक गेम्स साठी निवड झाली करण्यात आली होती. या प्रकारात एकूण 49 पुरुष व 36 महिला असे एकूण 85 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. यामध्ये अंजली भागवत, तेजस्विनी सावंत यासारखीआंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसोबत आयुषची निवड होणे ही नक्कीचकौतुकास्पद बाब म्हणावी लागेल. ही स्पर्धा बालेवाडी, पुणे येथे घेण्यात आली होती.

यापूर्वी आयुषने भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये 600 पैकी 563 गुण मिळवून भारतीय निवड चाचणीसाठी आपलीपात्रता सिद्ध केली होती. याच निकषावर त्याची महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली होती. सावंतवाडी येथील उपरकर शूटिंगचे कांचन उपरकर यांचे त्याला मार्गदर्शन लाभले होते. आयुषच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles