आमच्यासाठी हॉस्पिटल मंदिर अन् रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा – रवी जाधव. ; सावंतवाडी रुग्णालयास सामाजिक बांधिलकीने दिले विविध साहित्य.

सावंतवाडी : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून यावर्षी देखील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णपयोगी वस्तूंमध्ये रुग्णांचे कपडे व बेडशीट धुण्यासाठी 8kg ची वॉशिंग मशीन, कपडे सुकवण्यासाठी ड्रायर मशीन, ब्लड प्रयोगशाळेसाठी यू पी एक्स मशीन,सहा फुटी चार बेंच, 30 टेबल, दोन आराम खुर्च्या, डस्टबिन, मग, प्लास्टिक भांडी, 50 किलो वॉशिंग पावडर अशा विविध वस्तू हॉस्पिटलसाठी देण्यात आल्या.

सामाजिक बांधिलकी संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांची कन्या रुची पेडणेकर हिच्या वाढदिवसानिमित्त पेडणेकर यांच्याकडून सहा फुटी चार बेंच देण्यात आले. तर सामाजिक बांधिलकी कडून 30 टेबल व संस्थेची सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे ,रवी जाधव , सविता टोपले, शरद पेडणेकर, भाजी विक्रेता संदीप व सावंतवाडीचे बिट हवालदार प्रसाद कदम यांच्या मोठ्या सहकार्यातून एक हेवी वॉशिंग मशीन देण्यात आली तर सामाजिक कार्यकर्ती सीमा मठकर यांच्याकडून कपडे सूकविण्याची ड्रायर मशीन देण्यात आली.

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्याकडून ब्लड बँक साठी युपी एक्स मशीन व आराम खुर्च्या देण्यात आल्या. संस्थेच्या रूपा मुद्राळे व समीरा खलील यांच्याकडून रुग्णपयोगी प्लास्टिक भांड्यांचा संच व तीन मोठ्या बादल्या देण्यात आल्या.

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्याकडून 50 किलो वॉशिंग पावडर देण्यात आली. या आधी त्यांनी आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अर्ध्या किमतीमध्ये इन्व्हर्टर उपलब्ध करून दिला होता संस्थेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांचे सहकारी जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे, महिला जिल्हाध्यक्ष पूजा गावडे, तालुकाध्यक्ष संचिता गावडे व ज्ञानेश्वर पारधी उपस्थित होते.

रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीचे सचिव प्रणय गावडे ,पूजा निर्गुण व सुकन्या पवार उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे ब्लड प्रयोगशाळा कर्मचारी अमित लिंगवत, सरिता भटकडली व आचल उपस्थित होत्या.

सामाजिक बांधिलकीच्या सेवाभावी कार्याचा एकच उद्देश आहे की या सेवाभावी कार्याचा इतरांनी ही बोध घेऊन अशाच प्रकारे आपल्या गावातील आरोग्य केंद्रामध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अशा काही सुविधा ज्या वस्तू येण्यासाठी शासनाकडून प्रोसेसला थोडासा विलंब होतो त्यासाठी वाट पाहत राहू नये शक्य होईल तेवढ्या रुग्णपयोगी वस्तू आपल्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून द्याव्यात असे मत संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे ,रवी जाधव व राजू मसुरकर यांनी मांडले.
या कार्यक्रमाप्रसंगी सावंतवाडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अमोल चव्हाण उपस्थित होते. त्याचप्रमाणे तर जिल्हा रुग्णालयाचे आर एम ओ डॉ. सुबोध इंगळे, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर एवळे, डॉ. चौगुले डॉ.अवधूत, डॉ.देसाई, कार्यालयीन अधीक्षक रूपा हेळेकर, सिस्टर उभाळे, राणे, गोसावी, नाईक, मुंगी तसेच कर्मचारी वृंद तसेच तौसीब आगा, एडवोकेट शाबिया आगा व सावली फाउंडेशन अध्यक्ष प्राध्यापक सचिन पाटकर उपस्थित होते.
सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण सामाजिक बांधिलकीच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले तसेच वेळोवेळी सामाजिक बांधिलकीला सहकार्य करणारे सावंतवाडी पोलीस स्टेशनचे वीट हवालदार पि.के कदम यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सामाजिक बांधिलकी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक, सचिव समीरा खलील, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, रवी जाधव, रूपा मुद्राळे, सुजय सावंत,अशोक पेडणेकर, शरद पेडणेकर, शेखर सुभेदार, शरदनी बागवे, प्रसाद कोदे, विनोद केसरकर, ओमकार दळवी, आनंद भोगळे, संदीप कोलमकर, शितल पेडणेकर, रुची पेडणेकर, शामराव हळदणकर व हेलन निबब्रे यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles