वेंगुर्ला: श्री देवी संतोषी माता मठाधिपती आणि जय संतोषी माता पारंपारिक दशावतार नाट्य मंडळाचे मालक प. पू. भास्कर वैद्य यांच्या पत्नी अर्चना भास्कर वैद्य यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त आज ५ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजता जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडळाचा ‘टिटवी संग्राम’ हा दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
हा नाट्यप्रयोग भास्कर वैद्य यांच्या मातोंड-पेंडूर (सातवायंगणी) निवासस्थानी होणार असून या नाट्यप्रयोगाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भास्कर वैद्य यांनी केले आहे. या नाट्यप्रयोगात भास्कर वैद्य, रतिराज वैद्य, रोहन चव्हाण, अंकुश धामापूरकर, श्याम जाधव, यशवंत पाटेकर, जनार्दन चोपडेकर, जयानंद सावंत, ज्ञानेश्वर मांजरेकर, प्रभाकर धुरी तसेच उत्कृष्ट संगीत साथ, हार्मोनियम वादक – गुणाजी कदम,
पखवाज वादक- मनीष मेस्त्री, झांज वादक -संतोष गुळदुवेकर, सहाय्यक -नंदू करलकर, विनायक वैद्य, आपा वैद्य हे कलाकार सहभाग घेत आपली कला सादर करणार आहेत.
मातोंड-पेंडूर येथे आज ‘टिटवी संग्राम’ दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


