Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

बांगलादेशी घुसखोर हद्दपारीसाठी पुण्यात हिंदू संघटनांचा विराट मोर्चा ! ; शेवटचा बांगलादेशी भारताबाहेर जाईपर्यंत हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे आंदोलन चालू राहणार.! 

पुणे : देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बांगलादेशी घुसखोर देशातून हद्दपार करा, बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणार्‍यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा. संशयीत ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवून, बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा. पोलिसांना पूर्णपणे मोकळीक द्या, ते संपूर्ण देश बांगलादेशी घुसखोरमुक्त करतील. जोपर्यंत शेवटच्या बांगलादेशी घुसखोरावर कारवाई होऊन तो भारताच्या बाहेर जात नाही तोपर्यंत हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे आंदोलन चालू राहणार आहे, असे परखड प्रतिपादन हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधातील मोर्चा’त केले.
केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी देशभरात ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम’ राबवून सर्व बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांना देशाबाहेर हाकलावे, यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भव्य पायी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या समाप्तीनंतर हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने पुण्याच्या निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात देशभरात ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम’ राबवून त्यांना हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली.
‘राष्ट्र की रक्षा हम करेंगे, राष्ट्ररक्षक कहलायेंगे। भगवा थामे संकल्प लिया है, हर बांगलादेशी घुसपेठीया भगायेंगे !’ असा संकल्पही या मोर्चात करण्यात आला. या मोर्चामध्ये भाजपा, योग वेदांत समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, वंदे मातरम संघटना, शिवसेना, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री स्वामी समर्थ मंदिर दिंडोरी प्रणित, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा, वारकरी संप्रदाय, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, समस्त हिंदू आघाडी, पतीत पावन संघटना, स्वा. सावरकर स्मृती प्रतिष्ठान, राष्ट्र प्रथम प्रतिष्ठान, ॐ जय शंकर प्रतिष्ठान, सनातन संस्था आदी संघटनांसह हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री पराग गोखले, भाजपच्या रणरागिणी शाखेच्या उज्ज्वला गौड, तसेच मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी सहभागी झाले होते.
या वेळी बोलतांना श्री. घनवट पुढे म्हणाले की , देशभरात अनेक राज्यांत बांगलादेशी घुसखोरांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. यातून राज्याच्या सुरक्षेला मोठा गंभीर धोका निर्माण झाला असून सामाजिक अस्थिरता, गुन्हेगारी वाढ, रोजगाराची समस्या, तसेच खोट्या कागदपत्रांवर वास्तव्य करणार्‍यांचे मोठे रॅकेट राज्यात सक्रिय असल्याचे दिसून येते. अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांनी अनधिकृत स्थलांतरितांविरोधात कठोर धोरण अवलंबले आहे. भारतानेही तातडीने अशी कठोर कारवाई करायला हवी. तसेच प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून घुसखोरांविरोधात आवाज उठवला पाहिजे. जनतेने एकमुखाने मागणी केल्यास सरकारला बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येकडे लक्ष देणे भागच पडेल हे निश्चित !
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी अमेरिकेमधून अनाधिकृत लोकांना बाहेर काढायला सुरुवात केली. त्याप्रमाणेच भारतातूनही सर्व बांगलादेशी घुसखोरांना बाहेर घालवले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टर्मच्या वेळेला १६ मे या दिवशी सर्व बांगलादेशींनी आपली बॅग बांधून तयार राहावे असे सांगितले होते. तर आता अशा कोणत्या १६ मे ची वाट बघायला पाहिजे ? वर्ष २०२५ चा १६ मे हा अखेरचा ठरला पाहिजे.
ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles