सावंतवाडी : लाखे वस्तीतील 25 बेघर कुटुंबियांनी लाखे वस्तीतील शासकीय जागेमध्ये 25 नवीन घर बांधून मिळण्याची मागणी शिक्षण मंत्री दीपक केसकर यांच्याकडे केली होती याचा पाठपुरावा सावंतवाडी शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी केला होता. काल दिनांक 15 ऑगस्ट रोजी लाखेवस्तीतील समाजाने मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतल्यानंतर सर्व परिस्थिती जाणून त्यांच्या मागणीनुसार सदर लाके वस्तीतील मोकळ्या जागेतील 25 घरांचा आराखडा तयार करण्याचे आदेश नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिले. दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी लाखे वस्ती मध्ये जाऊन मुख्याधिकारी, शिवप्रसाद कुडपकर व सावंतवाडी शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी लाखे वस्तीमध्ये जाऊन मोकळ्या जागेची पाहणी केली त्या मोकळ्या जागेमध्ये 25 नवीन घर बांधण्यासाठी कशाप्रकारे आराखडा तयार करता येईल या संदर्भाची चर्चा मुख्याधिकाऱ्यांनी लाखे वस्तीतील बेघर कुटुंबांशी केली.त्याचप्रमाणे सदर घरे कोणत्या योजनेत बसतील त्याप्रमाणे सदर 25 घरांचा प्रस्ताव आमच्याकडून लवकरात लवकर तयार करून तुम्हाला काही दिवसात कळवणार आहोत असे आश्वासन सावंतवाडी शहराचे मुख्याधिकारी साळुंखे यांनी दिले.
त्याचप्रमाणे लाखे वस्तीत कोणकोणत्या प्रकारच्या समस्या आहेत त्याही समस्या त्यांनी मुख्याधिकारी यांच्या समोर मांडल्या. त्याही समस्यां सोडवण्या करिता विनंती केली.
मंत्री केसरकर यांनी बेघर कुटुंबीयांना नवीन 25 घरे बांधून देण्याचे आदेश दिल्यानंतर सर्व लाखे वस्तीतील कुटुंबीयांनी मंत्री दीपक केसकर यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे सतत पाठपुरवठा करणारे शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांचेही आभार मानले.
यावेळी उपस्थित लाखे वस्ती समाज व श्रीरासाई मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे, समाज बांधव सागर लाखे, नितेश पाटील, अंकुश लाखे, विकी लाखे, साई लाखे, राम लाखे,रोहन लाखे,रोहन पाटील, शुभम लाखे, अविनाश पाटील, गोपी पाटील, मनोज लाखे, मनोज पाटील, राजू खोरागडे,साई खोरागडे, मनोज लाखे, रघुनाथ लाखे, आदर्श पाटील रामा लोकरे व लाखे वस्ती मधील सर्व महिला वर्ग उपस्थित होता.
मंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकारातून लाखे वस्तीतील २५ बेघर कुटुंबीयांना नवीन घरे मिळण्याचा मार्ग मोकळा. ; शिवसेना शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांची माहिती.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


