सावंतवाडी : राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग विभागामार्फत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या वाढदिवस 24 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या वाढदिवस निमित्त व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष शिवाजी तळवणेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने 28 फेब्रुवारी रोजी औचित साधून महिला पदाधिकारी साडीवाटप करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री युवराज लखमराजे सावंत भोसले, जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, सचिव रामचंद्र कुडाळकर, जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे, जिल्हा सदस्य मनोहर पाटील, लक्ष्मण पेडणेकर, महिला जिल्हा उपाध्यक्ष पूजा सोनसुरकर, सावंतवाडी महिला तालुकाध्यक्ष संचिता गावडे, तालुका उपाध्यक्ष संगिता पारधी, शहर अध्यक्ष सेजल पेडणेकर, अंकिता माळकर, सपना नाईक, रेवती मुननकर, समीक्षा मोघे, रूपाली रेडकर, वनिता राणे, कविता गंगावळकर, सुरेखा पवार व अन्य महीला यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.


