Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

राज्यात आजपासून बारावीची परीक्षा, कॉपी रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर!

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. राज्यातील ३ हजार ३७३ केंद्रावर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. परीक्षेचा निकाल १५ मे पर्यंत लावण्याचे उद्दिष्ट मंडळाने ठेवले आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएसचा लाइव्ह ट्रॅकिंग होणार आहे. परीक्षा केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणही होणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॅाच असणार आहे.

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. यंदाही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी २७१ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नागपूर विभागात बारावीचे १ लाख ५८ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास ते केंद्र कायमस्वरूपी करण्यात येणार आहे. २०१८ पासून जे गैरप्रकार घडले त्या केंद्रावरील केंद्रप्रमुख,पर्यवेक्षक, लिपिक आणि शिपाई बदलले आहे. या केंद्रांवर तटस्थ शाळेचे स्टाफ नियुक्त करण्यात आले. यावर्षी परीक्षा केंद्रावर कॉपी किंवा इतर गैरप्रकार आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल.

सर्व पेपर कस्टेडियनपर्यंत पोहचवले –

बोर्डाकडून सर्व पेपर कस्टोडियनपर्यंत पोहचले आहे. ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी कस्टोडियन पोहचून लाईव्ह लोकेशन देणार आहे. धुळ्यात परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी 23 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यातील परीक्षेसाठी 47 केंद्र निर्माण करण्यात आले आहे. त्यात 24 हजार 557 विद्यार्थी प्रविष्ट आहेत. त्यात 13 हजार 821 विद्यार्थी तर दहा हजार 738 विद्यार्थिनी आहेत.

ADVT –

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles