Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

सैफ अली खानची १५ हजार कोटींची मालमत्ता जप्त होणार?

मुंबई : अभिनेता सैफ अली खानची 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार जप्त करणार असल्याचं कळतंय. त्याची ही मालमत्ता कुठे आहे, ती शत्रू संपत्ती ठरवली गेली का, शत्रू मालमत्ता कायदा म्हणजे काय, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहेत. भोपाळमधील पतौडी घराण्याच्या 15 हजार कोटींच्या वंशपरंपरागत मालमत्तेबद्दलचा हा वाद आहे. ही संपूर्ण मालमत्ता आता सरकारच्या ताब्यात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भोपाळमधील ही सगळी मालमत्ता सैफ अली खानच्या आजोबांशी संबंधित आहे. 2015 मध्ये भारत सरकारच्या ‘कस्टडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी’ या यंत्रणेनं ही मालमत्ता शत्रू संपत्ती म्हणून घोषित केली होती. त्यानंतर अभिनेत्री शर्मिला टागोर आणि त्यांचा मुलगा सैफ अली खान यांनी कोर्टात धाव घेतली होती. सैफची ही संपूर्ण संपत्ती सरकार ताब्यात घेणार की न्यायालय सैफच्या बाजूने निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles