Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सुधाकर कदम यांचा क्षत्रिय मराठा कदम परिवाराच्या राज्यस्तरीय संमेलनात गौरव!

खेड : क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे ७ वे राज्यस्तरीय कुलसंमेलन नुकतेच जामगे (खेड) येथे संपन्न झाले. सदर प्रसंगी नाम. योगेश कदम गृह (शहरी), महसूल, ग्रामीण विकास व पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषधी प्रशासन विभाग राज्यमंत्री यांच्या शुभहस्ते व बाबुराव कदम कोहळीकर (आमदार हदगाव नांदेड), आमदार अनिल कदम (निफाड), मा. महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम, उद्योजग गजानन कदम, प्रा. डॉ. सतीश कदम (अध्यक्ष – अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद), सुनील कदम (शस्त्र संग्राहक), राम कदम (सचिव), व अमरराजे कदम (अध्यक्ष – क्षत्रिय मराठा कदम परिवार, महाराष्ट्र राज्य) व अध्यक्ष श्री तुळजा भवानी भोपे पुजारी मंडळ, तुळजापूर या व इतर मान्यवरांच्या उपस्थित दसपटी विभागातील चिपळूण तालुक्यातील टेरव गावचे सुपुत्र व सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबईचे संचालक सुधाकर कदम यांच्या शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पोपट कदम लिखीत ‘कदम कुळाचा इतिहास’ हे पुस्तक तसेच श्री क्षेत्र तुळजाभवानी मातेचे कुंकू, प्रसाद व कवड्याची माळ देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांना कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई मंदिर श्री क्षेत्र टेरव, चिपळूण देवस्थानची दिनदर्शिका व टेबल दिनदर्शिका देवून मंदिरास भेट देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. सदर संमेलनास संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजरात व गोवा येथून हजारो क्षत्रिय मराठा कदम बांधव उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles