सावंतवाडी : शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 हे संपूर्ण राज्यभरात राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा धोरणाचा भाग म्हणून सुरू करण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून सावंतवाडी तालुक्यामध्ये पहिला टप्प्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. नवीन शिक्षण धोरणामध्ये जे बदल आहेत, ज्या नवीन संकल्पना आहेत. तसेच क्षमता अधिक प्रभावी करण्यात आलेल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार विनिमय, चर्चा या प्रशिक्षणात होणार आहेत. याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे.

या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शिक्षक दत्ताराम सावंत, पुरुषोत्तम शेणई, अमोल आपटे, बापूशेठ कोरगावकर, वंदना सावंत, तेजस्विता वेंगुर्लेकर, मंगेश ठाकूर, उमेश चव्हाण, प्रणिती भोयर, सुनिधी कोरगावकर काम पाहत आहेत. या प्रशिक्षणाचे उद्घाटन सावंतवाडी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांच्या हस्ते करण्यात आले.
ADVT –




