Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

Big News – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान तब्बल ४६ मिनिटे पाकिस्तानच्या हवाई हद्दीत!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांचे विमान ‘इंडिया 1’ नवी दिल्लीतून पॅरीसला गेले. यावेळी या विमानाने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर केला. अफगाणिस्तानचे हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या विमानास पाकिस्तान हवाई क्षेत्राचा वापर करावा लागला. त्यासाठी पाकिस्तानची परवानगी घेण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांचे विमान 46 मिनिटे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात होते. पाकिस्तानच्या शेखपुरा, हफीजाबाद, चकवाल आणि कोहाट या हवाई क्षेत्रातून हे विमान गेले. पाकिस्तानमधील माध्यमांमध्ये हा विषय चर्चेचा बनला आहे.

यापूर्वी केला होता वापर –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान नवी दिल्लीतून उड्डान भरल्यानंतर रात्री 11 वाजता पाकिस्तानच्या हवाई हद्दीत होते. त्यानंतर जवळपास 46 मिनिटे हे विमान पाकिस्तानच्या सीमेत होते. यापूर्वीही ऑगस्ट 2024 मध्ये  पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यूक्रेनला गेले होते. त्यावेळी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्यात आला होता. पाकिस्तानने मार्च 2019 पूर्वी सर्व प्रकारच्या हवाई हद्दीचा वापर करण्याचा बंदी घातली होती. परंतु त्यानंतर मार्च 2019 मध्ये हा निर्णय मागे घेतला होता. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांत तणाव वाढला होता. त्यामुळे पाकिस्तानने आपले हवाईक्षेत्र भारतासाठी बंद केले होते.

हवेत कशी असते पंतप्रधानांची सुरक्षा ? 

पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीजवळ असते. पंतप्रधानांच्या जवळ एसपीजी कमांडो असतात. पंतप्रधानांना चारी बाजूंनी या कमांडोंनी घेरलेले असते. पंतप्रधान कार्यक्रमस्थळी पोहचण्यासाठी हेलिकॉप्टरने जाणार असतील तर कमीत कमी एक रस्ते मार्ग पर्याय म्हणून तयार ठेवला जातो. त्या ठिकाणी सुरक्षा दल तैनात केले जातात. तसेच पंतप्रधानांच्या आगमनाच्या 24 तासांपूर्वी विमानतळ, धावपट्टी, कार्यक्रमस्थळ या ठिकाणांचा पूर्ण अभ्यास एसपीजीकडून करण्यात येतो.

हवेत कोण देतो सुरक्षा?

जेव्हा पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी जात होते, तेव्हा सुरक्षेची जबाबदारी कोणाची असते? त्यासंदर्भात सर्व देशांचा एक प्रोटोकॉल आहे. त्यानुसार राष्ट्रपती, पंतप्रधान जात असताना सुरक्षेची जबाबदारी त्या देशाची असते. परंतु त्या दरम्यान देशाची सुरक्षा यंत्रणा अलर्ट असते. समोरच्या देशासोबत संपर्क ठेऊन प्रत्येक हालचालींची नोंद घेत असते. भारतीय एजन्सी आणि एअरफोर्सचे अधिकारी अलर्ट मोडवर असतात. एअरफोर्सचे विमान 24*7 पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तयार असतात.

ADVT –

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles