सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथील आझाद मैदानावर दिनांक १५, १६ फेब्रुवारी रोजी ज्ञानदीप कला आणि क्रीडा मंडळ आयोजित राष्ट्रोळी क्रिकेट लीग (RCL) चे आयोजन करण्यात आले आहे, स्पर्धेचे हे सलग ९ वे वर्ष आहे.
या स्पर्धेत एकूण ८ संघ, १०० पेक्षा जास्त खेळाडू मैदानात उतरणार असून स्पर्धेचे आयोजन मोठ्या दिमाखदार पद्धतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी भिल्लवाडी गृप अध्यक्ष तथा समाजसेवक श्री.पांडुरंग राऊळ यांच्याकडून प्रथम पारितोषिक रोख रुपये २५,०००/- तसेचं कै.श्रावण गोविंद राऊळ यांच्या स्मरणार्थ श्री. पांडुरंग राऊळ यांसकडून विजेत्या संघास कायमस्वरूपी चषक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी तालुका संपर्क प्रमुख श्री. रुपेश राऊळ यांच्याकडून द्वितीय पारितोषिक रोख १५,०००/- तसेचं कै.विलास (बंड्या) दामोदर चिंदरकर यांच्या स्मरणार्थ श्री.योगेश दामोदर चिंदरकर यांच्याकडून उपविजेत्या संघास कायमस्वरूपी आकर्षक चषक ठेवण्यात आला आहे.
या शिवाय स्पर्धेतील ‘मालिकावीर’ कै.उदय हरी राऊळ यांच्या स्मरणार्थ अक्षय रामकृष्ण राऊळ यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आला आहे, उत्कृष्ट गोलंदाज सुरज शिरोडकर यांच्याकडून पुरस्कृत, उत्कृष्ट फलंदाज कै.प्रणव आजगावकर यांच्या स्मरणार्थ सिद्धेश आजगावकर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आला आहे , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गौरी फ्रृड्स प्रोडक्ट चे मालक सौ.गौरी फटनाईक यांसकडून पुरस्कृत व प्रत्येक सामन्यातील ‘सामनावीर’ X-Brand चे मालक समीर मळगावकर यांच्याकडून पुरस्कृत आणि ‘इले ते पाच मिञमंडळ’ यांसकडून सर्व संघ मालकांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
या लीग स्पर्धेतील सामने प्रत्यक्ष मैदानावर येऊन पाहत खेळाडूंचा उत्साह वाढवून क्रिकेटचा आनंद लुटण्याची सुवर्ण संधी क्रिकेट प्रेमींसाठी निर्माण झाली आहे.
ADVT –


सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.


