सावंतवाडी : तालुक्यातील मळेवाड (चराटकरवाडी) ते आजगाव (सावरदेव देवस्थान) येथील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.वाहनधारकांना सध्या वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.त्यात करून या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात होत असतात.मात्र या खड्ड्या कडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे यावरून दिसून येत आहे.
अक्षरशः या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन वाहनचालकांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची संबंधित विभाग वाट पाहत आहेत काय? असा संतप्त सवाल वाहनधारक,पादचारी करत आहेत.
तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यात बरेच पर्यटक येत असतात.त्यामुळे या रस्त्यावरून पर्यटक हे आजगव,शिरोडा ,रेडी , आरवली,वेंगुर्ले या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात.मात्र त्यांना या खड्डेयुक्त रस्त्याचा सामना करूनच पुढे जावं लागतं.त्यात करून एखादा इमर्जन्सी पेशंट इतरत्र न्यायचा असेल तर त्याचा त्रास पेशंटला मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करून हा रस्ता खड्डे मुक्त करावा, अशी सर्वसामान्य जनतेची, वाहनधारकांची मागणी आहे.
ADVT –



सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.


