Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

देशात, राज्यात अन् सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या विचारानेच कारभार.! : मंत्री नितेश राणे. ; कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मंत्री नितेश राणे यांनी केले अभिवादन.!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली कणकवलीनगरी!

कणकवली : देशात आणि महाराष्ट्र राज्यात आता शिवरायांच्या विचारांच सरकार आहे. शिवरायांना मान देणारे पंतप्रधान देशाचे नेतृत्व करत आहेत. राज्यात शिवछत्रपतींचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच कारभार होईल. कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात भव्यदिव्य अशी शिवजयंती साजरी करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे . त्यासाठी माझा पुढाकार असेल, तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्या असे आवाहन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.


कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त पालकमंत्री नितेश राणे कार्यक्रमात बोलत होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे , राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक , मुख्याधिकारी गौरी पाटील , बंडू हर्णे , मेघा गांगण , तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री , माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, किशोर राणे, उपाध्यक्ष कल्याण पारकर, आनंद पारकर, अनंत पारकर, श्री. डिचोलकर, प्रतीम म्हापसेकर, चेतन मुंज, श्री. हिर्लेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, शिवप्रेमींनी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती कणकवलीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य मिरवणूक काढत साजरी करतो . या ठिकाणच्या शिवजयंतीचा प्रवास तसा खडतरच होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनेक वर्ष रस्त्यात होता. त्याचठिकाणी शिवजयंती साजरी करावी लागत होती. कधीकाळी मोठी दुर्घटना घडण्याची प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात भिती होती. आपले सरकार या राज्यात आल्यानंतर कोणाचाही विचार न करता सन्मानाने आपल्या राजांना योग्य ठिकाणी आणून बसवलं आहे. शिवरायांनी स्वराज्य स्थापन करत असताना माझ्या रयतेचे हित कशात आहे हे पाहिले. त्यामुळे काही बाबतींमध्ये तडजोड होता कामा नये ,असे माझे मत आहे. त्यावेळी विरोध करणारी लोक होती , ती आता घोषणा देण्यासाठी पुढे पुढे करत आहेत , असा चिमटा यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले.
कणकवलीत छत्रपतींची शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घेतला आणि जयंती सुरुवात केली. त्यामुळे या शिवजयंतीला महत्तव आहे. शिवजयंती ही तिथीप्रमाणे दोनदा साजरी करायची नसते तर , वर्षाच्या 365 दिवस साजरी करायची असते. याठिकाणी आवश्यक ते बदल करण्यासाठी आपल्या सुचना घेवून प्रशासन योग्य तो बदल केला जाईल. प्रशासन आपल्याला विश्वासात घेवूनच याठिकाणी काम केले जाईल. याठिकाणी काम करत असताना कोणाचा विरोध सहन केला जाणार नाही आणि त्याची दखलही घेतली जाणार नाही , असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला .

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles