सावंतवाडी : महाराष्ट्र मंदिर महासंघच्या वतीने आंदोलन उद्या गुरुवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता गांधी चौक, सावंतवाडी येथे आंदोलन करण्यात येणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिराकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच समितीच्या निष्काळजीपणा व निष्क्रियतेमुळे होणारे धार्मिक नुकसान याबाबत सदर आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.