गणरायाच्या स्वागतासोबत माणुसकीची आरास, युवा नेते विशाल परब यांचा उपक्रम लई खास! ; गणेशभक्तांच्या घरोघरी पूजा साहित्य, दोडामार्गात उपक्रमाचा श्रीगणेशा! ; शक्ती केंद्रप्रमुख व बूथ अध्यक्षांच्या माध्यमातून गणेशभक्तांपर्यंत पोहोचणार साहित्य.

दोडामार्ग : कोकणच्या मातीत गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर श्रद्धेचा सुगंध, संस्कृतीचा वारसा आणि माणुसकीच्या नात्यांची घट्ट वीण जपणारा आनंदसोहळा! याच उत्सवाला सामाजिक बांधिलकीची किनार देत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गणेशभक्तांच्या घरोघरी पूजा साहित्य पोहोचविण्याचा संवेदनशील उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून दोडामार्ग तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुख व बूथ अध्यक्षांकडे गणेशपूजा साहित्य सुपूर्द करण्यात आले.

सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात या उपक्रमाचा उत्साहपूर्ण शुभारंभ झाला. युवा नेते विशाल  परब यांच्या हस्ते तालुक्यातील पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ अध्यक्षांकडे पूजा साहित्य सुपूर्द करण्यात आले. हे साहित्य केवळ वस्तू म्हणून नव्हे, तर गणरायाच्या स्वागतासाठीचा आपुलकीचा प्रसाद म्हणून प्रत्येक गणेशभक्ताच्या घरापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन परब यांनी कार्यकर्त्यांना केले.

कोकणातील गणेशोत्सवाची परंपरा म्हणजे घराघरात नांदणारा आनंद. या आनंदात प्रत्येक कुटुंब सहभागी व्हावे, त्यांच्या उत्सवात आपलेपणाची एक छोटीशी ज्योत पेटावी, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे पूजा साहित्याच्या या वाटपातून राजकारणापलीकडची सामाजिक बांधिलकी आणि जनतेशी असलेला जिव्हाळा अधोरेखित होत आहे.

यावेळी विशाल परब यांच्यासह रंगनाथ गवस, शिरीष नाईक तसेच तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुख महेश लोंढे, सूर्याजी झेंडे, सुरेंद्र संभाजी सावंत, प्रकाश गवस, संतोष आईर उपस्थित होते.

कार्यक्रमाला उसप बूथ अध्यक्ष नीलेश नाईक, नवनाथ साळिकर, विनायक सावंत, शंकर परब, किशोर शेट्ये, उत्तम दळवी, विठ्ठल गवस, वृषभ देसाई, ज्ञानेश्वर आईर, मंगेश नाटेकर, रमेश ठाकूर, चंद्रहास राऊळ, विजय चंद्रकांत ठाकूर, कल्पेश गवस, प्रवीण गवस, यशवंत कुबल, ओंकार रेडकर आणि बूथ अध्यक्ष विशाल चव्हाण यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘सण तुमचा, आनंद आमचा’; वर्षानुवर्षे उपक्रमाची परंपरा

विशालजी परब यांच्या पुढाकारातून गेली अनेक वर्षे गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. सालाबादप्रमाणे यंदाही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गणेशभक्तांच्या घरोघरी पूजा साहित्य पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या या पवित्र पर्वात ‘सण तुमचा, आनंद आमचा’ या भावनेतून प्रत्येक कुटुंबाच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ पूजा साहित्य वाटपापुरता मर्यादित न राहता जनतेच्या सुख-दुःखाशी नाते जोडणाऱ्या सामाजिक आपुलकीचा उत्सव ठरत आहे.

गणरायाच्या आगमनाची चाहूल लागलेली असतानाच घरोघरी पोहोचणारे हे पूजा साहित्य भक्तांच्या उत्साहात भर घालणार असून, विशाल परब यांच्या या उपक्रमाचे गणेशभक्त आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे.

“कोकणातील प्रत्येक कुटुंबाचा गणेशोत्सव आनंदात, उत्साहात आणि समाधानाने साजरा व्हावा, हीच या उपक्रमामागची भावना आहे. गणरायाच्या चरणी भक्ती अर्पण करताना समाजाशी असलेले आपले नातेही अधिक घट्ट व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे,” असे युवा नेते विशाल परब यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles