सावंतवाडी : आरपीडी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि परफेक्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय मोफत MHT-CET मंथन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम दिनांक २४ ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आरपीडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे पार पडणार आहे.
या प्रशिक्षण शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग व मेडिकल प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या MHT-CET परीक्षेची तयारी करून देणे हा आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शनासोबत महत्त्वपूर्ण नोट्स देखील मिळणार आहेत.
या उपक्रमाची माहिती विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. कशाळीकर मॅडम आणि परफेक्ट अकॅडमीचे संचालक डॉ. राजाराम परब यांनी दिली. सावंतवाडी तालुक्यातील बारावी विज्ञान शाखेतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालय व अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.
नावनोंदणीसाठी संपर्क:-
*📞 9325017458 / 9767125403
ADVT –

*नावनोंदणीसाठी संपर्क:*
*📞 9325017458 / 976712540*


