इन्सुली : इन्सुली येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराच्या चावी विषयी ग्रामपंचायतीने घेण्यात आलेल्या बैठकीत समाज मंदिरात कोणकोणते कार्यक्रम घेतले पाहिजेत? यावरून चर्चा होत असताना काही समाजातील लोकं गाव देवस्थानातील शिमगा, नारळ-ओटी कार्यक्रम समाज मंदिर परिसरात केल्याने समाज मंदिरच्या उद्दिष्टानाच हानीकारक आहे, असे रमाईनगरवाडीतील जाधव बांधवानी बैठकीत सांगितले. तसेच ज्या ठिकाणी महापुरुषांच्या पुरोगामी विचारांचा जागर केला जातो, तेथे अशा प्रकारचे अंधश्रद्धा निर्माण करणारे कार्यक्रम म्हणजे महापुरुषाची अवहेलना असल्याचे म्हटले व अशा प्रकारचे कार्यक्रम झाले तर आम्हाला मान्य नसून त्याला आम्ही विरोध करु, असे समस्त जाधव ग्रामस्थांनी सभेपुढे ठणकावून सांगितले. यावेळी सदर कार्यक्रम करणारे लोकांना हे मान्य नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने वरिष्ठापर्यन्त निर्णय होत नाही, तोपर्यंत समाजमंदिर बंद करून सील करण्याचा ठराव घेऊन समाज मंदिरला टाळे लावण्यात आले. यावेळी इन्सुली सरपंच श्री. वेंगुर्लेकर, ग्रामसेवक चव्हाण, सदस्य चराटकर, नाटेकर, परब, मेस्त्री, कृष्णा सावंत, पोलीस पाटील गावडे व इतर सदस्य आणि रमाईनगर येथील जाधव व इन्सुलकर समाजातील ग्रामस्थ उपस्थित होते. सदर बैठकीस बांदा पोलीस प्रतिनिधी देखील उपस्थित होते.
ADVT –




