Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

ऑस्ट्रेलिया – दक्षिण अफ्रिका सामन्याच्या निकालामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं चित्र पालटलं ! ; आता ‘करो या मरो’ची लढाई.

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत अ गटातून भारत आणि न्यूझीलंड या संघांनी धडक मारली आहे. दुसरीकडे ब गटातून अजूनही चित्र अस्पष्ट आहे. त्यामुळे कोण उपांत्य फेरी गाठणार हे सांगणं कठीण आहे. असं असताना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील निकालाने गुणतालिकेतील गुंता वाढला आहे. या गटातील उपांत्य फेरीचं गणित आता किचकट झालं आहे. त्यामुळे या गटातील प्रत्येक सामना ‘आता करो या मरो’ची लढाई असणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांनी पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून उपांत्य फेरी गाठण्याचं दोन्ही संघांचं स्वप्न होतं. पण पावसामुळे या स्वप्नावर पाणी पडलं आहे. कारण हा सामना नाणेफेक होण्याआधीच रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला आहे. साखळी फेरीतील सामन्यासाठी राखीव दिवस नसल्याने त्याचा फटका या दोन्ही संघांना बसला आहे. आता दोन्ही संघांना उपांत्य फेरीसाठी पुढचा सामना जिंकणं भाग आहे.

पावसाबाबत शेवटचा अपडेट घेतले गेले आणि सामना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली . सकाळपासून पाऊस पडत होता आणि मैदानातील कर्मचाऱ्यांना कोणतीही संधी देण्यासाठी थांबला नाही. कट-ऑफ वेळ संध्याकाळी 7 वाजून 32 मिनिटांची होती, पण हे मैदान 20 षटकांच्या सामन्यासाठी तयार होण्याची शक्यता नव्हती. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला आहे. इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील उद्याचा सामना आभासी बाद फेरीत बदलला आहे. यात पराभूत संघ बाहेर पडणारा तिसरा संघ असेल.

साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने अफगाणिस्तानला, तर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत केलं होतं. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी दोन गुण मिळाले होते. तर इंग्लंड आणि अफगाणिस्तानची झोळी रिती होती. हा सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेचे प्रत्येकी 3 गुण झाले आहेत. त्यामुळे इंग्लंड आणि अफगाणिस्तानला संधी मिळणार आहे.पण इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना करो या मरोची लढाई असेल. कारण हरणारा संघ थेट स्पर्धेबाहेर जाणार आहे अफगाणिस्तानचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी, तर दक्षिण अफ्रिकेचा शेवटचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे.

उपांत्य फेरीत जाण्याचे समीकरण बदलले –

दक्षिण आफ्रिकाबाबत बोलायचे झाल्यास या संघाने आपल्या आधीच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाला 107 धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियासोबतचा सामना रद्द झाल्यानंतर या संघाच्या खात्यात एकूण तीन अंक झाले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघासाठी उपांत्य फेरीत जाण्याचे समीकरण बदलले आहे.

दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत कसा पोहोचू शकतो? 

वर उल्लेख केल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिका बी ग्रुपमध्ये आहे. या संघाच्या नावावर तीन अंक आहेत. ऑस्ट्रेलिया संघालाही तीन अंक मिळालेले आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचे रन-रेट कमी आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा आणखी एक सामना बाकी आहे. हा सामना 1 मार्च रोजी इंग्लंड या संघाविरोधात होणार आहे. इंग्लंडविरोधातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय झाल्यास तो थेट उपांत्य फेरीत धडक मारेल.

तर दक्षिण आफ्रिकेच्या आशा पल्लवीत होणार

दुसरीकडे दक्षिण आफ्रिका इंग्लंड संघासोबतच्या सामन्यात पराभूत झाल्यास त्यांचे अंक फक्त तीन राहतील. अशा स्थितीत अफगाणिस्तान या संघाने इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यासोबतच्या कोणत्याही एका सामन्यात विजय मिळवल्यास दक्षिण आफ्रिकेच्या आशा पल्लवीत होतील. इंग्लंडला चार अंक मिळाले आणि अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांचे गुण समान होतील. असे झाले तर सर्वाधिक रन रेट असणारा संघ उपांत्य फेरीत जाईल.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles