महाशिवरात्री आणि शिवरात्री यातील फरक काय?
दिनविशेष –
हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. पण अनेकांना माहीत नाही की, वर्षभर दरमहा शिवरात्री असते. महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरी होते, तर इतर शिवरात्री दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला.

महाशिवरात्रीचा उद्देश आत्मिक उन्नती आणि मोक्षाचा आहे, तर इतर शिवरात्री भगवान शंकराची उपासना करण्यासाठी असतात.
दोन्ही सणांचे महत्त्व वेगळे आहे. महाशिवरात्री वर्षातून एकदाच साजरी केली जाते.

या वर्षी आज 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येत आहे. महाशिवरात्रीला महादेवाच्या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. शिवरात्री हा भगवान शंकराच्या पूजेचा दिवस असतो. शिवरात्री ही दर महिन्याला असून दरवर्षी एकूण 12 शिवरात्री असतात.

महाशिवरात्री मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. हा शिवविवाह आणि दिव्य रूपाच्या पूजेचा सण मानला जातो. तर प्रत्येक शिवरात्रीचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते.
- Advertisement -