आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात करिअर संसद स्थापना व शपथविधी सोहळा संपन्न.

वैभववाडी : येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत करिअर संसद स्थापना व शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.आर. चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून करिअर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ. अजित दिघे उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर करिअर कट्टा समन्वयक प्रा. सचिव भास्कर यांनी प्रास्ताविकात करिअर कट्टा उपक्रमाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर संसदेची भूमिका, कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शन, नेतृत्व विकास आणि रोजगारक्षमतेसाठी या उपक्रमाचे महत्त्व विशद केले.

यानंतर करिअर संसदेतील विविध पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये कु. संस्कृती कांबळे यांची करिअर संसदेच्या मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. तसेच इतर मंत्रीपदांवरील विद्यार्थ्यांचीही घोषणा करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी करिअर संसदेची शपथ घेऊन विद्यार्थ्यांच्या करिअर विकासासाठी, कौशल्य वृद्धीसाठी आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प केला.
प्रमुख अतिथी डॉ. दिघे यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, उद्योजकता, नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व विकास याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. चव्हाण यांनी करिअर कट्टा हा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम असून प्रत्येक विद्यार्थ्याने या व्यासपीठाचा सक्रियपणे लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, करिअर कट्टा समितीचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी करिअर संसद सदस्य कु. पूनम पावले यांनी केले, तर प्रा. राजे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी करिअर कट्टा समन्वयक प्रा. भास्कर व करिअर कट्टा समितीने विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles