Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मतदारांच्या भावनांशी खेळणाऱ्या दीपक केसरकर यांना आता जागृत मतदार नक्कीच जागा दाखवतील.! – उबाठा सेना जिल्हाध्यक्ष बाबुराव धुरी.

सावंतवाडी : कधी या पक्षात तर कधी त्या पक्षात असे सातत्याने पक्ष बदलून स्वतःचा स्वार्थ साधणारे, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेला सतत गोड बोलून झुलवत ठेवणारे, विकासाच्या मोठ्या मोठ्या बाता करून केवळ सत्ता उपभोगणाऱ्या, मतदारांच्या भावनांशी खेळणाऱ्या विद्यमान आमदार आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आता येथील जागृत मतदार नक्कीच जागा दाखवतील आणि महाविकास आघाडीला साथ देतील, असे विधान उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुराव धुरी यांनी केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या शिवसेना सावंतवाडी विधानसभा संपर्क यात्रा सोनुर्ली येथे शनिवारी पोहोचली. यावेळी श्री. धुरी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उबाठा शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, तालुका संघटक व माजी जिल्हा परिषद सदस्य मायकेल डिसोजा, काँग्रेसचे पदाधिकारी रवींद्र म्हापसेकर, भारती कासार, श्रीमती कासार, उपविभाग प्रमुख विनोद ठाकूर, बाळू परब, संजय गवस, कौस्तुभ गावडे, शब्बीर मणियार, अशोक दत्ताराम परब (शिवदूत), शाखाप्रमुख नरेश मोरे, युवा सेना विभाग प्रमुख संदेश मडुरकर, अनिल गावकर, नामदेव गावकर, अनिता गावकर, आर्वी गोसावी, बाबी धडाम, सोमा धडाम, सरस्वती धुरी, रुक्मिणी राऊळ, निलेश मोर्ये, संकेत गावकर, बापू मोर्ये, मारुती म्हापसेकर, सुरेश गावकर,तिळबा जाधव, उत्तम नाईक, धोंडीबा गावकर, महादेव गावकर, मनोहर गावकर, माई मौर्ये, रामचंद्र गावकर, वैभवी गावकर आदी उपस्थित होते.

सोनुर्ली येथे शिवसेना सावंतवाडी विधानसभा संपर्क यात्रा पोहोचली. यावेळी आयोजित कार्यक्रमात विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी मंत्री केसरकरांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील तब्बल 15 वर्षे आमदार असलेले व त्यातील साडेसात वर्ष मंत्रीपद उपभोगलेले आमदार दीपक केसरकर यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ साधला आहे. येथील जनतेला विकासापासून वंचित ठेवून त्यांनी जनतेच्या भावनांना तिलांजली दिली आहे.

दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाप्रमुख जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनीही आपल्या मनोगतातून मंत्री केसरकरांवर जोरदार प्रहार केला व उपस्थितांना महाविकास आघाडीलाच साथ द्यावी, असे आवाहन केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles