जळगाव : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या काही मैत्रिणींना त्रास दिल्याप्रकरणी जळगाव पोलिसांनी सोमवारी दोघांना अटक केली आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासह या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.
कोथळी गावात 28 फेब्रुवारीला रात्री संत मुक्ताई यात्रेत घडलेल्या घटनेप्रकरणी महाराष्ट्रातील मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात खडसे यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक माहिती अहवालामध्ये सात जणांची नावे आहेत. किरण माळी नावाच्या एका व्यक्तीला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तर जळगाव पोलिसांनी अनिकेत भोई आणि अनुज पाटील या दोघांना अटक केली आहे.
सोमवारी एका अल्पवयीन मुलालाही अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. इतर आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान, पोलिसांना असे आढळून आले की आरोपींनी यापूर्वीही अनेक मुलींशी गैरवर्तन केले आहे. तसेच यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांशीही आरोपींनी झटापट केली. याबाबत 17 वर्षीय मुलीने तक्रार केली होती आणि अंगरक्षकांनी सात आरोपींची नावे सांगितली.
भाजप नेते खडसे म्हणाल्या की, मी गुजरातमध्ये होते, म्हणून माझ्या मुलीने माझ्याकडे बाहेर जाण्याची परवानगी मागण्यासाठी फोन केला. मी तिला एक गार्ड आणि दोन ते तीन कर्मचारी सोबत घेण्यास सांगितले. माझी मुलगी आणि तिच्या मैत्रिणींचा आरोपींनी पाठलाग करून धक्काबुक्की केली. यावेळी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
ADVT –



