सावंतवाडी : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. यामध्ये, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील इयत्ता ३ री तील कु. अथांश बांदेकर, कु. प्रार्थना नाईक या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, कु. वेद बेळगावकर, कु. शिवेन पेडणेकर व कु. श्रियांश सावळ या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक, तर कु. शिवास पेडणेकर व कु. वीर शिंदे यांनी कांस्य पदक पटकावले. इयत्ता ४ थी मधील कु. गिरिजा चव्हाण हिने सुवर्ण पदक तसेच कु. उगम वेर्लेकर, कु. अद्वैत काळसेकर, कु. राधेश नाईक व कु. कुशल तांडेल या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे कांस्य पदक पटकावले. त्याचप्रमाणे, इयत्ता ५ वी मधील कु. चैत्राली पाटील हिने सुवर्ण पदक, कु. मनवा साळगावकर हिने रौप्य पदक तर, कु. भुवन दळवी व कु. गौरीश परब या विद्यार्थ्यांनी कांस्य पदक पटकावले. या कार्यक्रमात तालुका समन्वयक, परीक्षा केंद्र संचालक व गट शिक्षणाधिकारी कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून उपस्थित होते. वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रवींद्र मंगल कार्यालय, सावंतवाडी येथे मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मेडल्स व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाची विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक शिक्षक, प्रशालेतील मुख्याध्यापक यांनी उपस्थिती दर्शवून शोभा वाढवली. त्याचप्रमाणे, प्रशालेतील या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या परीक्षेसाठी बसलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय सहा. शिक्षिका सौ. चैताली वेर्लेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, प्रशालेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी वरील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
CONGRATULATIONS..! – ‘सिंधुरत्न टॅलेंट सर्च’ परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा डंका. ; ४ थीच्या गिरीजा सागर चव्हाणला सुवर्णपदक.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


