दुबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यापैकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयाचा मानकरी कोण ठरणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. अवघ्या काही तासांनी याचा निकाल लागेल. मात्र या सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी मनातली भीती व्यक्त करून दाखवली आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात हा सामना पार पडणार आहे. या सामन्यात तसं पाहिलं तर भारताचं पारडं जड आहे. पण आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडची चिवट खेळी विसरून चालणार नाही. भारताने साखळी फेरीच्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला होता. भारताने 249 धावांचं आव्हान दिलं असताना न्यूझीलंडचा डाव 205 धावांवर आटोपला होता. या विजयाचा मानकरी मिस्ट्री गोलंदाज म्हणून ओळख असलेला वरुण चक्रवर्ती ठरला होता. वरुण चक्रवर्तीने या सामन्यात 42 धावा देत पाच गडी बाद केले होते. त्यामुळे अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडला वरुण चक्रवर्तीचं स्वप्न पडत आहे. याबाबत न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे.
‘वरुण चक्रवर्ती खरंच चांगला गोलंदाज आहे. त्याने उत्तम गोलंदाजी केली आहे. आम्ही तेथील खेळपट्टीच्या परिस्थितीवरही एक नजर टाकू आणि त्याचा खेळावर काय परिणाम होऊ शकतो ते पाहू. तर, पहा, गेल्या सामन्यात आमच्याविरुद्ध ४२ धावांत पाच बळी घेतल्यानंतर तो नक्कीच खेळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि हो, आम्ही त्याच्याासठी आमचे प्लान देखील आखू.’ , असं न्यूझीलंडचे प्रशिक्षक स्टीड यांनी सांगितलं. इतकंच काय तर वरुण चक्रवर्तीने ऑस्ट्रेलियाविरुद्धही चांगली गोलंदाजी केली होती. 49 धावा देत दोन महत्त्वाच्या विकेट काढल्या होत्या. त्यामुळे न्यूझीलंडला अंतिम सामन्यात वरुण चक्रवर्तीची धास्ती असल्याचं स्टीड यांनी स्पष्ट केलं आहे.
“जेव्हा तुमच्यासमोर मनगटी फिरकी गोलंदाज असतो, तेव्हा तुम्ही फलंदाज म्हणून क्ल्यू शोधत असता. आणि मला वाटते की जेव्हा तुम्ही दिवसा उजेडात असता तेव्हा त्या गोष्टी पाहणे नेहमीच थोडे सोपे असते. तो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे यात शंका नाही. त्याने गेल्या वेळी आपले कौशल्य दाखवले होते आणि तो या सामन्यात एक मोठा धोका आहे. म्हणून त्याला टाळता येणार नाही. त्याच्याविरुद्ध आपण कसं खेळू शकतो याचा विचार करत आहोत.,” असंही स्टीड यांनी पुढे सांगितलं.
ADVT –


सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.


