सिधुदुर्गनगरी : कोकण रेल्वेच्या सहा स्टेशनवरील अडीअडचणी समस्या सुविधा शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील, कोकण रेल्वे वरिष्ठ अधिकारी सीएमडी आणि प्रवासी समन्वय समिती यांचा येत्या काही दिवसात स्टेशनपाहणी दौरा करू तसेच रेल्वेच्या विविध जलद गाड्या आणि सिंधुदुर्ग वैभववाडी पीआरएस सिस्टीमबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्योद्योग बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.


सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संपर्क कक्षाच्या उद्घाटनानंतर कोकण रेल्वे प्रवासी समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड, साई आंबेरकर, शुभम परब, संजय वालावलकर, स्वप्निल गावडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी झालेल्या चर्चेत कोकण रेल्वेच्या जिल्ह्यातीलस्टेशन वरीलअनेक समस्या प्रवाशांना त्रासदायक ठरत आहेत. या समस्या आणि सुविधाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झालेल्या करारानुसार त्या राज्यशासनाच्या निधीतूनलवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. तसेच कोकण रेल्वेच्या जलद गाड्या व अन्य सुविधांबाबत रेल्वेचे सीएमडीवरिष्ठ अधिकारी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि कोकण रेल्वे प्रवासी समन्वय समिती यांचा येत्या आठ दिवसात दौरा आयोजित करण्याबाबत निर्णय घेऊ. या सर्व प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्यातील आमदार, खासदार रेल्वे प्रशासनजिल्हा प्रशासन आणि कोकण रेल्वे प्रवासी समन्वय समिती यांची संयुक्त बैठक आयोजित करून कोकण रेल्वेच्या प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत समस्यांबाबत तोडगा काढू. सिंधुदुर्ग आणि वैभववाडी या कोकण रेल्वेच्या स्टेशनवर पीआरएस सिस्टीम सुरू करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री यांची तातडीने पत्रव्यवहार करून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिली.
यावेळी दिलेल्या निवेदनातकोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या मार्फत दिनांक 0 ६ आगष्ट २४रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा रेल्वेस्टेशन बाबतच्या विविध सुविधांच्या मागण्या आणि गाड्यांना थांबा आणि काही स्थानकांवर मिळावा यासाठी मा. संतोष कुमार झा साहेब निवेदन दिले होते त्यामध्ये स्थानकांच्या ऍप्रोच रोड बाबत ते खालील प्रमाणे आहे.
वैभववाडी रेल्वे स्थानक अॅप्रोच रोड आणि सुशोभीकरण देखभाल हे राज्य सरकारशी संबंधित आहेत त्याबाबत पीडब्ल्यूडी महाराष्ट्र शासन व रेल्वे कार्पोरेशन दरम्यान जानेवारी २०२३ रोजी एम.ओ.यु झालेला आहे. ,खारेपाटण रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता जानेवारी २०२३ मध्ये पीडब्ल्यूडी आणि के आर सी एल मध्ये सुधारणा आणि देखभालीसाठी एम ओ यु झाला आहे. ,आचिर्णे- रेल्वे स्थानक अॅप्रोच रोड सुधारणा आणि देखभालीसाठी जानेवारी २०२३ मध्ये एम ओयु झाला आहे. ,मडुरे-रेल्वे स्थानक अॅप्रोच रोड सुधारणा आणि देखभालीसाठी जानेवारी 2023 मध्ये एमओयू झाला आहे. ,लाईफटाइम मेडिकल कॉलेजकडे जाणार कसाल मेडिकल कॉलेज रस्त्यावर कोकण रेल्वे मार्गातील कसाल वझरेवाडी ब्रीज ना दुरुस्त आहे, तो नव्याने रुंदीकरनासह व्हावा. ,झाराप- पीडब्ल्यूडी आणि के आर सी एल मध्ये एप्रोच रोड सुधारणा आणि देखभाल साठी जानेवारी 2024 मध्ये एम ओ यु झाला आहे. ,सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकातील पीआरएस सुविधा कोरोना काळात बंद केली ओरोस पीआरएस ऑफिसमध्ये प्यारे सुविधा असल्याचे दिनांक २३ सप्टेंबर २०२४ च्या पत्रात ते म्हणतात व पोस्टामध्ये प्रति दिवस एक तिकीट विकले जाते असे ते म्हणतात परंतु पोस्टामध्ये पीआरएस सिस्टीम कार्यरत नाही विविध कारण सांगून ती बंद आहे आमचे आमच्याकडे लेखी पुरावा सुद्धा आहे, वरील एप्रोच रोडची कामे शासनाच्या निधीतून किंवा जिल्हा नियोजन माध्यमातून घेतल्यास लवकरात लवकर पूर्ण होतील, अशी मागणी केली आहे.


