कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेचा चौथा वधू वर पालक परिचय मेळावा व संस्थेचा स्नेह मेळावा असा संयुक्त कार्यक्रम रविवारी गोपुरी आश्रम वागदे कणकवली येथे विविध कार्यक्रमाने संपन्न झाला. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून व बुद्ध वंदनने कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली .त्यानंतर ममता जाधव यांच्या सुश्राव्य स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विचार पिठावर संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम, उपाध्यक्ष आनंद धामापूरकर ,खजिनदार रमेश कदम , सचिव मिलिंद सरपे माजी सचिव मोहन जाधव देवगड अध्यक्ष विजय कदम महिला प्रतिनिधी श्रद्धा कदम, रूपाली पेंढुरकर इत्यादी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे सचिव मिलिंद सरपे यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली तर उपाध्यक्ष आनंद धामापूरकर यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन एकाच वेळी वधू-वर पालक मेळावा व संस्थेचा स्नेह मेळावा असाच संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी होत असून संस्थेच्या विविध उद्दिष्टांची माहिती दिली . यावेळी श्रद्धा कदम यांनी जागतिक महिला दिनाचे व सोमवारी होणाऱ्या माता सावित्रीबाईंच्या स्मृतीदिनाचे महत्त्व सांगून या माता जन्माला आल्या नसत्या तर आम्ही आज व्यासपीठावर आलो नसतो हे स्पष्ट केले व त्यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी संस्थेचे आजीव सभासद अमृत महोत्सव साजरी केलेले सभासद इत्यादींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षपदावरून बोलताना सूर्यकांत कदम यांनी वयाने आणि कर्तुत्वानेही ज्येष्ठ असणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना समाजाचे ऋण फेडण्याची ही संधी असल्याचे सांगून त्यासाठी आम्ही एकत्र येऊन संस्थेची उभारणी केल्याचे सांगून संस्थेने अनेक ध्येय डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत अनेक उपक्रम राबविले असे स्पष्ट केले.

समाजातील उपवर मुला मुलींची लग्न जुळणे हे समस्या दिवसेंदिवस कठी होत असल्याने वधू-वर पालक मेळाव्यातून ही समस्या दूर व्हावी म्हणूनच हा वधू वर पालक मेळावा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजातील मुला मुलींचे वेळेत विवाह जुळावेत हा उदात्त हेतू यामागे असल्याचे सांगून संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली .संस्थेने तथागत नावाची पतसंस्था पहिली समाजाची संस्था उभारल्याचे सांगून त्या संस्थेच्या आम्ही जरी पाया घातला असला तरी पतसंस्था पुढे मोठी करण्यासाठी समाजाने आपले आर्थिक योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले .शेवटी आनंद धामापूरकर आभार मानले. या कार्यक्रमानंतर दुपारच्या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी सुमारे 40 वधू-वरांनी नोंदणी केली होती.
ADVT –


सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.


