Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

स्त्री जातीचा योग्य सन्मान हाच शिवरायांना खरा सलाम.! : जावेद शेख. ; मल्लसम्राट प्रतिष्ठानने कष्टकरी व आत्मनिर्भर महिलांचा केला गौरव.

सावंतवाडी : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील खरे स्वराज्य निर्माण करायचे असेल तर प्रत्येकाने स्त्री जातीचा सन्मान केलाचं पाहिजे. कारण महाराजांनी नेहमीच पर स्त्रिला मातेसमान मानले आहे. म्हणून आज तब्बल 395 वर्षानंतरही महाराजांना हृदयापासून पूजले जाते. शिवरायांची हीच शिकवण लक्षात घेऊन मल्लसम्राट प्रतिष्ठान आपले उपक्रम राबवून शिवरायांची महती जपत आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो, असे प्रतिपादन सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मल्लसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त अत्यंत कष्टातून लघु उद्योग उभारून आत्मनिर्भर जीवन जगणाऱ्या आणि समाजाला दिशा देणाऱ्या कष्टकरी महिला सौ. लक्ष्मी केळुसकर, विद्या दळवी, स्वाती करमळकर, प्रतीक्षा परब, भाग्यश्री राऊळ यांचा सन्मान करण्यात आला.  यावेळी श्री. शेख बोलत होते.

या कार्यक्रमास संस्थेचे सचिव ललित हरमलकर, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सहसचिव फिजा मकानदार, खजिनदार गौरव कुडाळकर, सामाजिक कार्यकर्ते सुधीर धुमे, श्री. नेवगी काका, ग्रामसेवक सहदेव राऊळ, तसेच सदस्य नागेश सूर्यवंशी दशरथ गोंड्याळकर, बुधाजी हरमलकर, साबाजी परब, मृणाल शिरोडकर, किशोर हरमलकर, बाळा हरमलकर, आदित्य हरमलकर, महादेव राऊळ आदि उपस्थित मान्यवर उपस्थित होते.

हॉटेल उद्योजिका प्रतीक्षा परब यांचा विशेष सन्मान –

दरम्यान मातोंड या गावातून सावंतवाडी या शहरात येऊन महालक्ष्मी रेस्टॉरंट हे छोटेसे हॉटेल उभारून आपल्या कुटुंबाला आत्मनिर्भर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या सौ. प्रतीक्षा प्रदीप परब यांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.  सावंतवाडी शहरात श्री महालक्ष्मी हॉटेलच्या माध्यमातून त्यांनी छोटासा उद्योग उभारला. मात्र आज याच उद्योगातून त्यांनी हॉटेल व्यवसायात बऱ्यापैकी यशस्वी मजल मारली आहे .त्यांच्या या कार्यात त्यांचे पती प्रदीप परब यांचाही मौलिक वाटा आहे. या सत्कार्यावेळी मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या विधायक कार्याचा गौरव प्रतीक्षा परब व प्रदीप परब यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिजा मकानदार यांनी केले.  प्रास्ताविक सचिव पैलवान ललित हरमलकर यांनी तर उपस्थितांचे आभार गौरव कुडाळकर यांनी मानले.

ADVT –

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles