सावंतवाडी : येथील रहिवासी व सध्या मुंबई येथे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून इन्टर्नशीप करत असलेल्या तनिष महेश चव्हाण या युवकाने कोलकाता येथील डॉ. मौमिता डेबनाथ या पिडीतावर झालेल्या अमानुष अत्याचारावर एक कविता लिहिली आहे. सध्या ही कविता सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे तनिषने याआधीही अनेक कविता लिहिल्या पण त्या कधीही सोशल मीडियावर पोस्ट केल्या नव्हत्या. मात्र आता लिहिलेली त्याची ‘बेटी की इज्जत, देश का फर्ज.!’ ही कविता सोशल मीडियावर अनेकांना अंतर्मुख करणारी आहे.

तनिष हा आजगाव अध्यापक विद्यालयाच्या प्रा. प्रतिभा चव्हाण यांचा चिरंजीव असून प्रतिभा चव्हाण यांनी अनेक मराठी चित्रपट व मालिकांमध्ये भूमिका केलेले आहेत.
‘बेटी की इज्जत, देश का फर्ज.!’
एक प्यारी रात नहीं,
जिस काली रात में हैवान ना निकले,
वो लडकी की क्या गलती,
जो घर से दुआँ मांगने निकले.?
हैवान निकले इस तरह,
के खा गये उस लडकी की दुआँ,
उस लडकी को क्या पता
वो जो थें इंसान के भेस में,
पूरी तरह हैवान निकले.?
यह किस्सा उस लडकी का ही नहीं,
जो आज कल अखबारमें दिखे,
हैं गलती सारे हैवानों की
पर हरबार वो हैवान
पुलिस की हाथोसे बच निकले.
हैं जमाना बकबक करनेवाला,
ना इस जमाने के हाथ चलते,
सोचो हैं सारी अपनी माँ-बहने,
तब जाके वो हैवान ना निकले.?
सोचो उन लडकियों का क्या हाल हुआ होगा?,
जो हर दिन अपनों की सुरक्षा की, दुआँ मांगनें दुवा निकले.!
– तनिष प्रतिभा महेश चव्हाण,
सावंतवाडी.



